शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘मैं भी चौकीदार’ला भाजप नगरसेवकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:38 IST

असंतोष कायम : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

ठाणे : ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरातील ५०० पैकी मुंबईसह मोजक्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मोदी यांच्याशी दुहेरी संवाद साधण्याची रविवारी संधी मिळाली. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यावेळी मोकळेपणाने उत्तरेही दिली; मात्र या कार्यक्रमाला भाजपाच्या बहुतांश नाराज नगरसेवकांनी मारलेली दांडी चर्चेचा विषय होती.

ठाणे महापालिका भवनाजवळील ज्ञानराज सभागृहात ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वा.च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधानांनी थेट दिल्ली येथून यावेळी संवाद साधला. महाराष्टÑातील मुंबई तसेच ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थान अशा मोजक्याच राज्यांतील सात ते आठ कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोदी यांच्याशी संवाद साधला. आपली शक्ती तपासण्यासाठी अंतरिक्षयानाचीही चाचणी घेण्यात आली, यात गैर काहीच नाही. बड्या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. यापुढे त्यांना तुरुंगात घातले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.दीड तास रंगलेल्या या संवादाच्या कार्यक्रमात आपण कसा विकास केला, यावरच त्यांनी भर दिला. यावेळी भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले, शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाणे लोकसभा) नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.नाराजी नसल्याचा दावाच्या कार्यक्रमाला भाजपच्या २३ पैकी गटनेते अशोक राऊळ, नारायण पवार, संजय वाघुले, सुनेश जोशी, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, प्रतिभा मढवी, नंदा पाटील, दीपा गावंड, स्रेहा आंब्रे, नम्रता कोळी अशा मोजक्याच नगरसेवकांनी हजेरी लावली. इतरांनी दांडी मारल्याने तर्कवितर्क काढले जात होते.च्युती झाल्याने आता हे किरकोळ विषय मागे पडल्याचा दावा एका भाजप पदाधिकाऱ्याने केला. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या पातळीवरच नगरसेवकांच्या नाराजीचा विषय मिटला असल्याचा दावा अ‍ॅड. संदीप लेले यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेNarendra Modiनरेंद्र मोदी