शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाक प्रकरणी पतीचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:12 IST

ट्रिपल तलाक कायदा लागू झाल्यानंतर देशातील पहिलाच गुन्हा मुंब्य्रात दाखल झाल्याने आरोपींच्या जामीन अर्जाकडे अनेकांचे लक्ष होते

ठाणे : ट्रिपल तलाक प्रकरणातील मुंब्रा येथील आरोपी पती इम्तियाज पटेल याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश (चौथे) व्ही.वाय. जाधव यांनी सोमवारी फेटाळला. सासू रेहना पटेल (६०) आणि नणंद सुलताना खान (४०) या दोघींना मात्र सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ट्रिपल तलाक कायदा लागू झाल्यानंतर देशातील पहिलाच गुन्हा मुंब्य्रात दाखल झाल्याने आरोपींच्या जामीन अर्जाकडे अनेकांचे लक्ष होते.या प्रकरणातील फिर्यादी जन्नत बेगम इम्तियाज पटेल (३२) यांचे म्हणणे ऐकल्यानंतरच जामीन अर्जावर सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार, सोमवारी जन्नत यांची बाजू ऐकल्यानंतर न्या. जाधव यांनी इम्तियाज याचा जामीनअर्ज फेटाळला.ट्रिपल तलाक कायद्यान्वये १ आॅगस्ट २०१९ रोजी जन्नत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती इम्तियाज, सासू रेहना आणि नणंद सुलताना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. इम्तियाजने पत्नी जन्नत हिला ३० नोव्हेंबर २०१८ रोजी व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक दिला होता. विशेष म्हणजे जन्नत सात महिन्यांची गर्भवती असताना पतीने तिला मोबाइलवरून तलाक दिला. शिवाय, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, ही बाब सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.सासू रेहना आणि नणंद सुलताना यांनी चौकशीला सहकार्य करणे, पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तसेच जन्नत हिला कोणत्याही प्रकारे धमकावू नये, अशा अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. इम्तियाजने शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. ए.ए. फकी यांनी, तर फिर्यादी तसेच सरकारच्या वतीने अ‍ॅड. संजय मोरे यांनी बाजू मांडली.पतीच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्हपत्नी सात महिन्यांची गर्भवती असताना पती अशा प्रकारे तलाक देत असेल, तर त्याची मानसिकता दिसून येते. त्याने ज्या मोबाइलवरून हा तलाक दिला, तो मोबाइल आणि त्याला सासऱ्याने दिलेली मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करायची असल्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी अ‍ॅड. मोरे यांनी केली. या सर्व बाबी ग्राह्ण धरून न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक