शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा वृद्धेवर हल्ला; पत्नीला वाचवण्यासाठी ७२ वर्षांचा पती बिबट्याला भिडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:02 IST

हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

खोडाळा/मोखाडा : शुक्रवारी रात्री दहा वाजता वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी ७२ वर्षीय पती काशिनाथ सापटे यांनी प्रतिकार करून आपल्या पत्नीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. दरम्यान, या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे (वय ७२) व त्यांची पत्नी पार्वती सापटे (वय ६५) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. यामुळे पार्वती बघायला उठल्या आणि अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केल्य़ानंतर पतीने बाहेर जाऊन आपल्या पत्नीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली, मात्र तरीही बिबट्या पळून न जाता त्याने तिथेच बस्तान मारले. हे पाहून या पती-पत्नीने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेऊन बिबट्याला पिटाळून लावले. परंतु, काही वेळातच बिबट्या परत गावाकडे येताना ग्रामस्थांना दिसला. मग, ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाचारण केले असता वनविभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी व इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे या ठिकाणी बिबट्याच्या दहशतीच्या घटना ताज्या असताना आता बिबट्याचा मोर्चा मोखाडा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर वळला आहे. या घटनेचे वृत्त समजताच पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सापटे कुटुंबाने दाखवलेल्या धैर्याचे निकम यांनी कौतुक केले. ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनबिबट्याच्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या आपली शिकार करण्यासाठी मानव वस्तीकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी बेफिकीर न राहता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या