शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

डोंबिवली रेल्वे स्थानकात अडथळ्यांची शर्यत

By admin | Updated: June 4, 2016 01:38 IST

रेल्वे फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमधील वाढलेले अंतर, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, अस्वच्छता, भिकारी, बंद असलेली शौचालये तसेच फलाट क्रमांक-३, ४ आणि ५वर अर्धवट

डोंबिवली : रेल्वे फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमधील वाढलेले अंतर, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, अस्वच्छता, भिकारी, बंद असलेली शौचालये तसेच फलाट क्रमांक-३, ४ आणि ५वर अर्धवट शेड आदी समस्यांमुळे डोंबिवलीतील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आणि गर्दीचे हे स्थानक असतानाही येथे रेल्वे प्रशासन कधी सुविधा पुरवणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.फलाट क्रमांक १-अ,२ आणि ५वर फलाट आणि लोकलच्या फूटबोर्डमध्ये मोठी गॅप आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढणे-उतरणे कठीण होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना बसत आहे. दरवेळी ही गॅप कशी निर्माण होते, त्यावर प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार, प्रवाशांचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असे प्रश्न प्रवासी विचारत आहेत. त्याचबरोबर फलाट क्रमांक १, १-अ, २आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. ते फलाटात कुठेही झोपतात. त्यामुळे गर्दी व धावपळीच्या वेळी त्यांच्या अंगावर पाय पडून ते चावण्याची भीती आहे. अनेकदा कुत्र्यांमध्ये भांडणेही होतात. त्यांच्या भुंकण्याचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागतो. काही प्रवासी फलाटावरील कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यांना खायला घालतात. त्यामुळे अस्वच्छतेचा मुद्दाही गंभीर बनला आहे.स्थानकात स्वच्छतागृहांची संख्या वाढण्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातही कहर म्हणजे फलाट क्रमांक २, ३ आणि४वरील कल्याण दिशेकडील स्वच्छतागृह प्रशासनाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे. प्रवासी जागा मिळेल, तिथे आडोसा घेत शौचाला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फलाटात दुर्गंधी पसरते. स्थानकातील पुलांवर फेरीवाले बसतात. कल्याण दिशेकडील पुलावर सकाळी आणि सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते ठाण मांडतात. पूर्वेला रामनगर, पश्चिमेला दीनदयाळ रोडच्या बाजूस आणि विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोर रेल्वेच्या प्रवेशद्वारातच ते व्यवसाय करतात. त्यामुळे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करतच रेल्वेस्थानक गाठावे लागते. परिणामी, त्यांची चांगलीच दमछाक होते. पश्चिमेतील फलाटाबाहेरील बेकायदा बांधकामे हटवण्यात आली आहेत. असे असतानाही मधल्या पुलासाठी फलाट क्रमांक ‘१-अ’वर प्रवेशद्वार खुले केलेले नाही. त्यामुळे कल्याण दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांना फलाट ‘१-अ’वर प्रवेश करून, तर पश्चिमेकडील प्रवाशांना आरक्षण केंद्रापर्यंत तंगडतोड करूनमधला पूल गाठावा लागत आहे.सर्व समस्यांबाबत प्रवाशांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. त्या सोडवण्याची केवळ आश्वासनेच स्थानिक अधिकारी देत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)