शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी विरोधात महिला सदस्याचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:12 IST

प्रशासनाकडून होत असलेली मनमानी व कारवाईच्या विलंबास अनुसरून शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा आधीच दिला. त्यास अनुसरून समाजकल्याण विभागाने लेखी देऊन कारवाई केल्याचे त्यात नमुद केले. पण समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित केल्याचे त्यांचे पती विलास शेवाळे यांनी सांगिते. पण प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे व समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याच्या आरोपाखाली संबंधीत सचिवांवर अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी वृषाली शेवाळे यांनी लावून धरली

ठळक मुद्देम्हारळगांव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकासाकडे दुर्लक्ष समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याचा आरोप समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित

ठाणे : कल्याण तालुक्यातील म्हारळगांव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकासाकडे दुर्लक्ष, तसेच इंदीरानगर दलित वस्ती रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास विलंब, समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याचा आरोप आदींच्या विरोधात ठाणेजिल्हा परिषदेच्या सदस्या वृषाली शेवाळे यांनी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी म्हारळगांव येथील संबंधीत रस्त्यावर पोषण करण्याचे निश्चित केले आहे.          प्रशासनाकडून होत असलेली मनमानी व कारवाईच्या विलंबास अनुसरून शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा आधीच दिला. त्यास अनुसरून समाजकल्याण विभागाने लेखी देऊन कारवाई केल्याचे त्यात नमुद केले. पण समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित केल्याचे त्यांचे पती विलास शेवाळे यांनी सांगिते. पण प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे व समाज कल्याण समितीमध्ये अनुसुचित जातीचे सभासद जाणीवपूर्वक घेतले नसल्याच्या आरोपाखाली संबंधीत सचिवांवर अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हा नोंदवण्याची मागणी वृषाली शेवाळे यांनी लावून धरली आहे. तसे निवेदन त्यांनी कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हाधिकारी यांना देखील आधीच दिले आहे.दलित वस्तीशेष फंडातून म्हारळ दलीत वस्तीसाठी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील इंदिरा नगर या दलीत वस्तीच्या रस्त्यावर दहा लाख रूपये खर्चही झाले. पण तो रस्ताच अस्थित्वात नसल्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांच्याकडे देखील दिलेले आहे. मात्र त्यास अनुसरून अद्यापही ठोस कारवाई झाली नसल्याचे आरोपाखाली त्यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे निश्चित केले. साधी दखलीही घेतली नसल्यामुळे संतापलेल्या शेवाळे ह्यांनी उपोषणाचा मार्ग आवलंबला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधार सभेत ही या विषयांवर चर्चा झाली. यावेळी चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन अध्यक्षा व मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले .यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पहाणी करु न गटविकास अधिकारी यांना दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ज्या रस्त्याचे कामकाज केले तो रस्ताच अस्थित्वात नाही. तरीदेखील त्याच्या कामाचे बील अदा करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची, तसेच म्हारळ येथील इंदिरा नगर दलितवस्ती क्र . ३ मधील रस्ता नादुरु स्त व रहदारीस योग्य नसल्याने सदर रस्ता कॉंक्र ीटीकरणासाठी निधी तात्काळ मंजुर व्हावा आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी वृषाली शेवाळे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा मार्ग आवलंबला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदthaneठाणे