शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अंबरनाथमध्ये काँग्रेसने पाण्यासाठी रक्तदान करीत काढला मोर्चा

By पंकज पाटील | Updated: April 28, 2023 18:07 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला.

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणी समस्येविरोधात काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' असे म्हणत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदान सुद्धा केले. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला. 

        अंबरनाथ शहराच्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे अखेर 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अशी घोषणा देत काँग्रेसने थेट रक्तदान करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनीही यावेळी रक्तदान करत पाण्याची मागणी केली. रक्तदान केल्यानंतर नागरिकांनी जीवन प्राधिकरणावर पाहण्यासाठी मोर्चा काढला. अंबरनाथ पश्चिमेच्या इंदिरा भवन ते पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो महिला आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी मिलिंद बसनगार यांची भेट घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पाण्यासाठी चांगलंच धारेवर धरले. मोर्चा निघणार असल्यामुळे आज वेळेवर पाणी सोडले, मग इतके दिवस पाणी का येत नाही? असा जाब काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विचारला. त्यावर यापुढे दर एक दिवसाआड दोन तास पाणी देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र एक दिवसाआड नको, तर दररोज किमान १ तास पाणी देण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. ही मागणी मान्य करत पाणीपुरवठा करण्याचर आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली. 

एसी बंद आहे, गर्दी कमी करा : काँग्रेसचा मोर्चा जीवन प्राधिकरणावर आल्यानंतर शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्यासोबत चर्चेसाठी कार्यालयात प्रवेश करताच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी ' एसी बंद आहे, गर्दी कमी करा' असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना देताच काँग्रेसचे नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. मोर्चातील नागरिक उन्हात असताना तुम्हाला एसीची हवा हवी आहे का असे म्हणत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.  

टॅग्स :ambernathअंबरनाथcongressकाँग्रेस