शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांच्या ऑनलाइन वाचक कट्ट्याला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : हौशी महिला वाचकांनी इंटरनेटच्या युगात कोविड काळात केवळ लहान मुलांसाठी एकत्र येऊन ऑनला‌‌ऊन वाचन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : हौशी महिला वाचकांनी इंटरनेटच्या युगात कोविड काळात केवळ लहान मुलांसाठी एकत्र येऊन ऑनला‌‌ऊन वाचन कट्ट्याचा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या कट्ट्याची सुरुवात झाली. वेंगुर्ला, खेड, डोंबिवली, ठाणे, पुणे, अंबरनाथ, दिवा अशा विविध शहरांमधून मुलांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

धनश्री दांडेकर, मानसी वाळुंजकर आणि दीप्ती लेले या महिला ऑनलाइनच एकत्र आल्या आणि मुलांना विरंगुळा, मनोरंजन यातून वाचनाची आवड व्हावी, या उद्देशाने हा कट्टा सुरू केला आहे. आतापर्यंत या कट्ट्यावर ४० मुला-मुलींनी सहभाग दर्शवला असून, त्यांचे लहान आणि मोठा असे गट तयार करण्यात आले आहेत. चौथी ते सहावी आणि सातवी ते नववी अशी ग्रुपची विभागणी आहे. सध्या एक दिवसाआड उपक्रम सुरू असून, लवकरच दुसरी बॅच सुरू करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हल्ली मुलांना वेगवेगळे क्लास लावून ऑलराऊंडर बनवण्याचा पालक प्रयत्न करत असतात. बहुतांशी ते साध्य होतातही; पण बरेचदा संकल्प करूनही प्रत्यक्ष कृतीत न येणारी गोष्ट म्हणजे नियमित वाचन. मुलांची आणि पालकांची हीच गरज लक्षात घेऊन या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात या वाचकप्रेमींनी केल्याचे वाळूंजकर यांनी सांगितले.

या वाचन कट्ट्यावर मुलांनी त्यांच्याकडील कविता, बोधकथा, ऐतिहासिक कथा आणि रामायण, महाभारतातील विविध कथा यांचे वाचन करायचे असते. त्यांच्या वाचनातील सुधारणासुद्धा या कट्ट्यावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासोबतच मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हाच प्रामाणिक हेतू या वाचन कट्ट्याचा आहे. बाल वाचकांना या वाचन कट्ट्यावर यायचं असल्यास अवश्य संपर्क साधावा, त्याना एकत्र येण्याची इंटरनेट लिंक शेअर केली जाईल, असे आवाहन महिला पालकांनी केले आहे.

-----------

फोटो आहे.