शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची फी भरायची तरी कशी? आंदोलनाचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:03 IST

वसई-विरारमधील पालक आर्थिक संकटात : आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : जागतिक कोरोना महामारीमुळे तीन ते चार महिने घरीच बसून असलेल्या सर्वसामान्य पालकांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. घरात आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. असे असताना वसई तालुक्यातील शाळांनी मनमानी शैक्षणिक शुल्क वाढीव दराने आकारल्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांनी या प्रकरणी वसईच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत वसईतील शाळांनी मनमानी शुल्क कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळांच्या मनमानी धोरणाबाबत बहुजन विकास आघाडी आता मैदानात उतरत असल्याने शिक्षणसम्राटांचे धाबे दणाणले आहेत. ‘बविआ’च्या इशाऱ्यानंतर सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर शाळांनी भर दिला आहे. वसईतील खासगी शाळांच्या तगाद्यानंतर आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांसाठी नवे मोबाइल फोन, तसेच ऑनलाइन क्‍लासेससाठी वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. यात पालकांना भुर्दंड सोसावा लागला. कोरोनाकाळात शाळांनी अडचणीत असलेल्या पालकांप्रति सहानुभूती दाखवून त्यांना दिलासा देणे सयुक्तिक होते; परंतु शाळांनी कोरोनाकाळात शैक्षणिक शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावला होता. मध्यंतरी, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांच्याकडे पालकांनी तक्रार केली होती. जाधव यांनी संबंधित शाळा प्रशासनाची भेट घेत शैक्षणिक शुल्कात कपात करून पालकांना दिलासा दिला होता. त्यांच्या आवाहनानंतरही शाळा व्यवस्थापन सुधारले नसल्याचे चित्र आहे.

बविवा आक्रमकआता त्यांनी वसईच्या गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांत शाळांना मनमानी शुल्क कमी करण्याचे आदेश दिले नाहीत; तर बहुजन विकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. काही पालकांनी याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार हितेंद्र ठाकूर, पोलीस उपायुक्तांनाही निवेदने दिली.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा