शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कदायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
4
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
5
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
6
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
7
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
8
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
9
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
10
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
11
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
12
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
13
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
14
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
15
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
16
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
17
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
18
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
19
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
20
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचे पंख किती वेळा छाटणार? खासगी कंपनीसाठीच हे सगळं चाललंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 06:58 IST

हा छळ कमी म्हणून की काय...

नारायण जाधव,उप-वृत्तसंपादक

राज्य शासनाने पुन्हा एकदा सिडकोचे पंख छाटले आहेत. यावेळी ते ऑरेंज स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका खासगी कंपनीसाठी छाटले आहेत. या कंपनीसाठी पेणनजीकच्या नैना परिक्षेत्रातील पाच गावांतील १,१५१.६१ हेक्टर अर्थात २,८७९.२५ एकर इतकी जमीन ‘नैना’मधून वगळली आहे. यात ४६.१५ हेक्टर, अर्थात ११४ एकर जमीन ऑरेंज सिटीत मोडते. हे सर्व पाहता सिंह व मुंग्यांची गोष्ट आणि त्यात माकडांनी घातलेला गाेंधळ आठवताे.असाच प्रकार सध्या नवी मुंबईसह नजीकच्या उरण-पनवेल-पेण-अलिबाग परिसरात पाहायला मिळत आहे. येथे मुंग्यांच्या भूमिकेत सिडको आहे, तर माकडांच्या भूमिकेत सेझ, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि खासगी बिल्डर आहेत अन् सिंहाच्या भूमिकेत त्या त्या वेळचे राज्यकर्ते.शासनाने १९९७ साली सिडकोची स्थापना केल्यानंतर या संस्थेने जहरी टीका सहन करून नवी मुंबईसारखे देखणे शहर उभारले. सोबत नवीन औरंगाबाद, नाशिक, लातूर, नांदेड या शहरांना मदत केली. अलीकडे नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरू केले. अशा सिडकोचे पहिल्यांदा पंख छाटले गेले ते नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर. नंतर जेएनपीटीला मोठी जमीन दिली.

कालांतराने नवी मुंबई विमानतळासाठी स्थापन केलेल्या २७० गावांच्या ‘नैना’ परिक्षेत्राची तर शासनाने पूर्ण वासलात लावली आहे. आधी ‘नैना’मधून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूकडील २ किमी परिघात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची १७ फेब्रुवारी २०१६ मध्ये नियुक्ती केली. आश्चर्य आहे ना रस्ते बांधणाऱ्या संस्थेस शहर बांधण्याचे काम. यानंतर पनवेल महापालिकेत ३० गावे गेली. हे कमी म्हणून की काय, नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून एकेकाळी वगळलेल्या आणि आता पुन्हा नवी मुंबईत आलेल्या १४ गावांच्या नियोजनाचे अधिकार सिडकोकडून काढून एमएमआरडीएकडे सोपविले.

    आता पुन्हा एमएमआरडीए खासगीकरणातून उभारत असलेल्या ग्रोथ सेंटरसाठी पेणजवळील पाच गावांतील १,१५१.६१ हेक्टर अर्थात २,८७९.२५ एकर इतकी जमीन ‘नैना’मधून वगळली आहे. यात ऑरेंज स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका खासगी कंपनीचा मोठा वाटा आहे.

    आधीच ‘नैना’च्या ११ टीपींची वासलात लागली आहे, अनेक प्राधिकरणांमुळे त्यांची एक ना धड, भारंभार चिंध्या झालेल्या आहेत, यामुळे विकासकही मेटाकुटीला आले आहेत. यामुळे सिडकोची अवस्था अगदी गोष्टीतील मुंग्यांसारखी झाली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोMumbaiमुंबईthaneठाणे