शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रीला गृहसंकुलांनी सहकार्य केले पाहिजे- सिताराम राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 01:40 IST

वृत्तपत्र विक्रीला शासनाने परवानगी दिलेली असतांना काही ठिकाणी सोसायटयांमधून वृत्तपत्र वितरणाला बंदी घातली जात आहे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे वाचकांनी त्याचा आदर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील  सर्व गृहनिर्माण संस्थांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसंकुलांमध्ये प्रवेश देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य शासनाने घरोघरी वृत्तपत्र विक्रीला आता परवानगी दिली आहे. तरीही काही ठिकाणी सोसायटयांमधून वृत्तपत्र वितरणाला बंदी घातली जात आहे. अशी वृत्तपत्र विक्रीची अडवणूक कोणीही करु नये. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी केले आहे.आपल्या पत्रात राणे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने ८ जून पासून शहरांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे ठाणे, मुंबई, पुणे अशा महानगरांमध्येही काही प्रमाणात कामकाज सुरु होणार आहे. अनेक भागांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता दुकानेही सम विषम या तारखांनुसार सुरु ठेवण्याला परवानगी दिली आहे. या सर्व निर्णयांबरोबरच राज्य शासनाने वृत्तपत्र घरोघरी वितरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे रविवारी ७ जून पासून वृत्तपत्र विक्रेते घरोघरी जाऊन वृत्तपत्र वितरीत करणार आहेत. शासनाने वृत्तपत्र घरपोच वितरणासाठी आदेश दिलेले असल्यामुळे त्यात गृहनिर्माण संस्थांना अडथळा आणता येणार नाही. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असल्यामुळे वाचकांनी त्याचा आदर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील  सर्व गृहनिर्माण संस्थांनी आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहसंकुलांमध्ये प्रवेश देऊन सहकार्य करावे. हे करतांना विक्रेते, वृत्तपत्र वितरक आणि गृहसंकुलांनीही त्यासाठी आवश्यक त्या खबरदारी घ्याव्यात, असे आवाहन राणे यांनी केले आहे.