शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माणमंत्र्यांचा दिलासा; तरीही पोलिसांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:02 IST

वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत.

ठाणे : तांत्रिकदृष्ट्या अतिधोकादायकमध्ये गणल्या गेलेल्या वर्तकनगर येथील १४ आणि १६ या दोन इमारतींच्या रहिवाशांना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे महापालिकेनेही कारवाई न करण्याबाबतचा दिलासा दिला आहे. तरीही, वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत.ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने म्हाडा वसाहतीमधील पोलीस निवासस्थाने असलेल्या या दोन इमारतींना धोकादायक इमारतीचे तांत्रिक परीक्षण अहवाल (स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट) तसेच स्थैर्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) सादर करण्याची नोटीस चार महिन्यांपूर्वी बजावली होती. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत सी-२ बी (अर्थात रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे) या प्रवर्गात समाविष्ट केली. दरम्यान, ठामपाच्या पॅनलवरील एका वास्तुविशारदाकडून तांत्रिक परीक्षणही येथील रहिवाशांनी केले. मात्र, कोरोनामुळे दुरुस्तीची कामे अर्धवट राहिल्यामुळे स्थैर्यता प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी दुसऱ्या वास्तुविशारदाकडून पदरमोड करून रहिवाशांनी तांत्रिक परीक्षणही केले. दुरुस्तीही सुरू झाली. तोपर्यंत भिवंडीची दुर्घटना झाल्याने महापालिकेने (दुरुस्ती करून राहण्यायोग्य असलेल्या) इमारतीला अतिधोकादायकचा फलक लावला. तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले. त्याचआधारे वर्तकनगर पोलिसांनी ही घरे तातडीने रिक्त करण्याच्या नोटिसा बजावल्या. हीच कैफियत पोलीस कुटुंबीयांनी मांडल्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी यात मध्यस्थी केली. स्थैर्यता प्रमाणपत्र आणि किरकोळ दुरुस्ती करण्याच्या अटीवर कारवाई न करण्याचे ठामपाच्या सहायक आयुक्त पंडित यांनी मान्यही केले. तरीही, शनिवारी पुन्हा येथील पोलीस कुटुंबीयांना वर्तकनगर पोलिसांकडून घरे रिक्त करण्याचे फर्मान आल्याने घरांचे स्थलांतर कसे करायचे, या तणावातच येथील कुटुंबीय आहेत. रविवारी पुन्हा या कुटुंबीयांनी आपली कैफियत मांडल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी चर्चेअंती घरे रिक्त करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळविण्यात येईल, असे आश्वासन आव्हाड यांनी या कुटुंबीयांना दिले.या कारणांसाठी रहिवाशांचा नकारइमारतीमध्ये एका अधिकाºयासह आठ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ठाण्यात ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना देऊ केलेली सिद्धी हॉल येथील पर्यायी वसाहतीची अवस्था या इमारतींपेक्षाही बिकट आहे. निवृत्त तसेच मृत पावलेल्या कुटुंबीयांचा कोणताही विचार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारत अतिधोकादायक नसून ती दुरुस्त करून राहण्यायोग्य असल्यामुळेच घरे रिक्त करण्याला रहिवाशांचा नकार आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड