शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हाउसिंग फेडरेशन करणार सामूहिक अग्निहोत्र, १० हजार ठाणेकर होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:38 IST

ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या होमकुंडासह सर्व साहित्याचेही मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी दिली.येत्या ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उपवन तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये हा अनोखा उपक्रम होणार आहे. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकापासून पोखरण रोड क्रमांक एक येथील कॅडबरी कंपनी आणि पोखरण रोड क्रमांक दोन येथील मारिया हॉल तसेच माजिवडा येथून ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) दुपारी ३.३० ते ५.३० या काळात बसची व्यवस्था केली आहे.सामूहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपुरी येथील गजानन महाराज यांनी सुरू केलेला आहे. तो सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेलाच करणे अपेक्षित असतो. असा अग्निहोत्र घरी केल्यास त्यापासून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विद्यार्थ्यांसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्र मास शिवपुरी येथील डॉक्टर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सोसायट्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभागया अग्निहोत्रासाठी वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर या भागातील अनेक गृहसंकुलांतील रहिवासी सहभाग घेणार आहेत. याच परिसरातील आर.जे. ठाकूर, थिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही आपला सहभाग नोंदविणार आहे. दहा हजार रहिवासी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील साडेचार हजार रहिवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही राणे यांनी सांगितले.या अग्निहोत्रासाठी जोडप्याने एकत्र बसण्याची आवश्यकता नसून कोणतीही व्यक्ती बसू शकते. अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. त्याचा उपयोग आपल्या परिसरातील पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन आॅक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण कमी होते. याला शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता आहे. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असंख्य कुटुंबे अग्निहोत्राचे आचरण करून त्यापासून लाभ मिळवित असल्याचा दावाही राणे यांनी केला.

टॅग्स :thaneठाणे