शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम धर्मगुरूंच्या निधनाच्या धक्क्याने संतप्त जमावाने फोडले रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 06:58 IST

ऐन रमजानच्या काळात मीरा रोडमधील मशिदीतच शिया समाजाच्या धर्मगुरूंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना

मीरा रोड : ऐन रमजानच्या काळात मीरा रोडमधील मशिदीतच शिया समाजाच्या धर्मगुरूंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्याचा धक्का बसल्याने संतप्त जमावाने रूग्णालयात तोडफोड केली. नयानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वेळेत उपचार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून जमावाचा गैरसमज दूर करत परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यात आल्याने तणाव आणखी वाढला.मीरा रोडच्या नयानगरमधीलहैदरी चौकात शिया समाजाची मशीद आहे. रमजान सुरू असल्याने उत्तर प्रदेशहून इमाम सईद एहसान हैदर रिझवी (५२) धार्मिक कार्यासाठीआले होते. मंगळवारी रात्री अचानक रिझवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लागलीच त्यांना रात्री साडेदहा वाजता जवळच्या वोक्हार्ट रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर प्रकृती असलेल्या रिझवी यांच्यावर डॉक्टरांनी ४० मिनिटे उपचार केले, पण त्याला प्रतिसाद न देता त्यांचे निधन झाले.ही घटना कळताच त्यांचे नातलग व अन्य रहिवाशांनी आरोप करत रुग्णालयात गोंधळ घालण्यास व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर, रु ग्णालयात तोडफोड सुरू केली. बाहेर असलेल्या वाहनाची काच फोडली.