शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनआशीर्वाद यात्रेच्या तासभरआधी सुरू होते खड्डे भरण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 01:22 IST

शिवसेनेला धारेवर धरले जात होते, त्या फॉरेस्ट नाका रस्त्यावरूनच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली.

अंबरनाथ : शिवसेनेला धारेवर धरले जात होते, त्या फॉरेस्ट नाका रस्त्यावरूनच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. फॉरेस्ट नाक्याचा रस्ता हा एमएमआरडीएच्या चुकीमुळे थांबलेला आहे. शहरातील सर्वात वादग्रस्त असलेल्या फॉरेस्ट नाक्याच्या रस्त्यावरून यात्रा सुरू करण्यात आली. या रस्त्याची दुरवस्था लपवण्यासाठी २४ तास रस्त्यावर काम सुरूहोते. यात्रा सुरू होण्याच्या तासभर आधीपर्यंत मार्गावरील खड्डे भरले जात होते.अंबरनाथ शहरातून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कल्याण लोकसभा मतदारसंघात आली होती. या यात्रेला अंबरनाथमधून सुरुवात करण्यात आली. या यात्रेसाठी ठाकरे हे रात्री उशिरा अंबरनाथमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यावर ११ वाजता यात्रेला सुरुवात झाली. आदित्य येणार असल्याने मंगळवारी दिवसभर या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू होते. पुन्हा रात्री खड्डे पडणार हे लक्षात आल्यावर खड्डे भरणाºया ठेकेदाराला सकाळी पुन्हा ८ वाजता रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगण्यात आले.या मार्गावरील सर्वात खराब रस्ता फॉरेस्ट नाक्यावर असल्याने त्या ठिकाणी ठेकेदारचे कामगार खड्डे भरण्यासाठी उभेच होते. यात्रा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे काम संपवत हा मार्ग खुला करण्यात आला. हीच परिस्थिती अंबरनाथ उड्डाणपुलाचीही होती. त्याठिकाणीही रस्ते भरून रस्ता सुरळीत करण्यात आला होता.रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागत कमान उभारण्यात आल्या होत्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.