शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधीत रुग्णांकडून हॉटेलचालकांची लुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:16 IST

कोरोनाची अधिकची लक्षणे नसणाºया रुग्णांवर आता शहरातील दोन तारांकीत हॉटेलमध्ये उपाचार पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. परंतु या हॉटेलचा दिवसाचा खर्च भरतांना कोरोना बाधीत रुग्णाला घाम फुटण्याची वेळ आली आहे.

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध खाजगी रुग्णालये आरक्षित ठेवण्यात आली आहेत. परंतु आता कोरोनाची लक्षणे दिसत नसतांनाही ज्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असेल त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु येथील दिवसाचेच भाडे अव्वाच्या सव्वा असल्याने कोरोना बाधीत रुग्ण हैराण झाले आहेत.ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला ७५० हून अधिक कोरोनाचे रुग्ण उपाचारासांठी विविध रुग्णालयात दाखल आहेत. परंतु दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे, त्यात ज्या रुग्णांना कोरोनाचा जास्त त्रास होत नसेल आणि ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नसतील अशा रुग्णांवर आता शहरातील दोन हॉटेलमध्ये उपचार सुरु झाले आहेत. त्या अनुषगांने या दोनही हॉटेलमध्ये जवळ जवळ ५० ते ५५ रुम आरक्षित करण्यात आले आहेत. तर येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रत्येकी तीन डॉक्टरांची काम करीत आहे. त्यानुसार आजच्या घडीला येथे, ३० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु आता या रुग्णांना दिवसाचे भाडे देतांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनामुळे आधीच उपासमारीची वेळ आली असतांना, त्यातही रोजगाराची श्वास्वती नाही. अशातच आता रुग्णालयाव्यतिरीक्त हॉटेलमध्ये उपचार सुरु झाल्याने त्याचे भाडे भरतांना कोरोना बाधीत रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी एक दाम्पत्याला पालिकेने येथे उपचारासाठी पाठविले होते. परंतु, हॉटेलचे एका दिवसाचे भाडे ऐकूणच त्या रुग्णाला भर उन्हात घाम फुटला होता. दिवसाला ६ हजार भरावे लागतील असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. एकाचे ६ हजार दोघांचे दिवसाचे १२ हजार आणि १४ दिवस उपचारासाठी दाखल व्हावे लागले तर हा खर्च जवळ जवळ दोन लाखांच्या घरात जाणार होता. त्यामुळे त्याने तेथे दाखल होण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पालिकेकडून अ‍ॅब्युलेन्स मागवून रुग्णालयात हलविण्यात यावे अशी मागणी केली. परंतु दुपारी ४ वाजल्यापासून ते दोघे अ‍ॅम्ब्युलेन्सची वाट पाहत होते. रात्री ११.३० च्या सुमारास अ‍ॅब्युलेन्स आली. त्यामुळे हा मनस्तापही या रुग्णांना सहन करावा लागत आहे.त्यातही पालिकेकडे केवळ ४ च्या आसपास अ‍ॅब्युलेन्स असल्याने त्या कुठे कुठे पाठवायच्या असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आता या हॉटेल चालकांनीही लुट सुरु केल्याचेच दिसत आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या