शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक; दोन पीडित महिलांची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: June 22, 2025 21:21 IST

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली काही मुलींच्या मार्फत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजर अंकितकुमार यादव (२५) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी रविवारी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील वंदना सिनेमा कम्पाउंड वंदना एसटी बस स्टॅडसमोरील जुना आग्रा रोड भागातील हॉटेल शिव वंदना इन लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग येथे काही तरुणींकडून ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गुगलवर जाहिरात देऊन पैशाच्या आमिषाने मुलींच्या मार्फत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. यातील मुलींचे फोटो ग्राहकांना तसेच ते एस्कॉट सर्व्हिससाठी पाठविले जात असल्याचीही माहिती समोर आली.

त्याच माहितीच्या आधारे चौधरी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, जमादार डी. के. वालगुडे, हवालदार व्ही. आर. पाटील, आर. यू. सुवारे आणि के. बी. पाटील यांच्या पथकाने २० जून रोजी या हॉटेलवर एका बनावट गिऱ्हाइकाच्या मदतीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. याच छाप्यात देहविक्रीसाठी आणलेल्या दोन मुलींची सुटका केली. एका मुलीमागे पाच हजार रुपये घेतले जात होते. यातील काही रक्कम ही मुलींना तर काही रक्कम दलाल स्वत:कडे आणि हॉटेलसाठी ठेवून हे सेक्स रॅकेट चालवीत असल्याचेही उघड झाले. यामध्ये दोघे जण फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.गुगलवर दिला होता एस्कॉर्ट सर्व्हिसचा क्रमांक

यादव आणि त्याच्या साथीदारांनी गुगलवर ठाण्यात मुलींच्या एस्कॉर्ट सर्व्हिससाठी काही क्रमांक दिले होते. त्याच आधारे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी