शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:27 IST

या वाढत्या रुग्णसंख्येवरील उपाययोजनेंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतिगृह पुढील आदेश येईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे: जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागांसह शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रांतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरील उपाययोजनेंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतिगृह पुढील आदेश येईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशासह जिल्हाधिकाऱ्यांनी  इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे ऐच्छिक केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन शिक्षण पूर्ववत सुरू ठेवण्याचे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.  ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रणासाठी आदिवासी विकास विभागासह समाजकल्याण, नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे.  अंमलबजावणी करण्यास  टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेSchoolशाळाStudentविद्यार्थी