शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: ‘म्हाडा’तर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल; नवे धोरण आणले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:45 IST

म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळेच म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना परडवणारी घरे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. त्या माध्यमातून लोकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.

ठाण्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ संगणकीय सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, ज्यांना घरे मिळणार आहेत, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सरकार म्हणूनही आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते.  महागडी घरे घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही, त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती. 

पारदर्शक सोडतम्हाडाच्या लॉटरी पद्धतीत अतिशय पारदर्शकता आहे, अर्ज भरण्यापासून घर देईपर्यंत ऑनलाइन काम केले जाते. यात ब्रोकर किंवा इतर कुणी घर मिळवून देण्याचे आमिष  दाखवत असेल तर ते खोटे आहे.

सर्वसामान्यांच्या गृह स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री

मुंबईत प्रत्येकाला घर गेल्या दीड वर्षात १३ सोडती काढून १३ हजार घरे देण्यात आली. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यानेच म्हाडाचे नवे धोरण लवकरच आणले जात आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. म्हाडा, एसआरएचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत.  चेंबूरला १७ हजार घरांचा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न आहे.  प्रत्येकाला मुंबईत घर मिळावे यासाठी प्रयत्न आहे. आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टरला ठाण्यात मान्यता दिली आहे. ठाण्यात चार ते पाच ठिकाणी क्लस्टरचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीEknath Shindeएकनाथ शिंदे