शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी रुग्णालय, सरनाईकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 06:14 IST

आंदोलनाचा इशारा : शिवसेनेला घरचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस पुन्हा पार्किंग प्लाझा येथे सुपरस्पेशालिटी  हॉस्पिटल  सुरू करण्याच्या मुद्द्यावरून चव्हाट्यावर आली आहे.  या प्रस्तावित हॉस्पिटलला सत्ताधारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी पार्किंग प्लाझाच ठेवावे, अशी सूचना करून हॉस्पिटल उभारल्यास त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा घरचा अहेर त्यांनी मंगळवारी सत्ताधारी शिवसेनेला दिला.  

तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पात पार्किंग प्लाझा उभारण्यासाठी मान्यता दिली. परंतु, आता तेथे रुग्णालय उभारण्याचा घाट घातला जात असल्याने सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे. 

 हॉस्पिटलसाठी चुकीची इमारतवास्तविक पाहता पार्किंग प्लाझाची प्रत्येक मजल्याची उंची ही ८ फुटांपेक्षा कमी आहे. या जागेची निर्मिती पार्किंग प्लाझाच्या नियमानुसार केली आहे. हॉस्पिटलसाठी ही जागा नियमानुसार वापरता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पार्किंग प्लाझाच्या शेजारीच मोठे अद्ययावत हॉस्पिटल आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीचा असल्याने व कायद्याच्या कक्षेत बसत नसल्याने पालिकेच्या या चुकीच्या प्रस्तावाला नगरविकास विभाग मान्यता देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

घोडबंदरच्या आरक्षित भूखंडावर हॉस्पिटल बांधापालिकेला हॉस्पिटल निर्माण करावयाचे असेल तर  घोडबंदर येथील आरक्षित भूखंडावर ते बांधून त्याचा मोफत कसा लाभ होईल याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी सुचविले आहे. त्यामुळे या जागेचा हॉस्पिटल म्हणून वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला असेल तर त्याला तीव्र विरोध राहील व त्यासाठी वेळप्रसंगी मला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा दमही त्यांनी भरला आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक