शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय संगीताचा सन्मान करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 07:36 IST

समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शस्त्रीय संगीतात आहे. त्यात प्रभाताईंचे योगदान मोलाचे आहे.

ठाणे :

समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शस्त्रीय संगीतात आहे. त्यात प्रभाताईंचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा पोहोचवली आहे. ही त्यांची तपस्या आहे. सरकार कलाप्रेमी असून शास्त्रीय संगीताच्या कायम पाठीशी उभे राहील. शास्त्रीय संगीतासाठी काही उपक्रम, योजना असल्यास त्या मांडा. त्यांचा त्यांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.

ख्यातनाम गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. गडकरी रंगायतनमध्ये गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे १४ व्या बासरी उत्सव आयाेजित करण्यात आला हाेता. याप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी काढली. ‘वयाने ज्येष्ठ असलो तरी मनाने तरुण राहिले पाहिजे’ असे बाळासाहेब नेहमी सांगत याचा मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. बाळासाहेबांच्या कृपेनेच गडकरी रंगायतन झाले. त्यामुळे येथे हाेणाऱ्या कार्यक्रमांतून कलावंतांना दुप्पट, तिप्पट प्रेरणा मिळते. ठाणेकर हा ठाणेकर आहे, तो कधी बदलत नाही. त्यामुळेच ठाण्यात येण्याचा आनंद आगळावेगळा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, गुरुकुल प्रतिष्ठानचे विवेक सोनार, ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.

श्राेत्यांची दाद अन् प्रेम सर्वात माेठे श्रोत्यांची दाद आणि प्रेम सर्वात मोठे असते. आजचा पुरस्कार हा माझ्या साधनेला मिळालेली सुरेल दाद आहे. हरीजी आणि माझे जुने संबंध आहेत. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळत असल्याने माझा हा आनंद द्विगुणित झाला आहे.- डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे