शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:19 IST

राज्य शासनाकडे लवकरच व्यक्त करणार नाराजी

सुरेश लोखंडेठाणे :  जिल्ह्यातील १५८ पैकी १५३ ग्रामपंचायतींच्या १४७२ सदस्यांसाठी निवडणूक होऊन ते विजयी झाले. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांमधून निवडून आलेल्या या सदस्यांपैकी सरपंच आाणि उपसरपंच यांनाच मानधन दिले जाते. मात्र, उर्वरित सदस्यांना ते दिले जात नसल्यामुळे त्यांच्यातील नाराजी लवकरच राज्य शासनाच्या दरबारी ऐकविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यातील दोन लाख ५० हजार ५०० मतदार या एक हजार ७२ सदस्यांना निवडून दिले आहे. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि इतरांची ओढवून घेतलेली नाराजी या सदस्यांना काही वर्षे तरी शांत बसू देणार नाही. असे असूनही या विजयी उमेदवारांना मानधनाची तजवीज शासनाकडून अद्यापही झाली नसल्यामुळे त्यांच्यातील असंतोष लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. या सदस्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक एक महिन्यांपूर्वी म्हणजे १५ जानेवारीला झाली. एप्रिल ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. त्यासाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले होते.

जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.  या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती; पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.

 

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत