ठाणे : किसननगरमधील निवासी भागात दोन महिलांनी घर भाड्याने घेऊन सेक्स रॅकेट चालू ठेवले होते. याची साधी भनकही घरमालकाला त्यांनी लागू दिली नाही. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने मंगळवारी धाड टाकल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाला. त्यावेळी हा प्रकार समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला.वागळे इस्टेट, किसननगर क्रमांक-३ येथील ‘मातोश्री अपार्टमेंट’मधील तळ मजल्यावरील एका खोलीत कुंटणखाना चालवणाऱ्या सुमित्रा शेट्टी (३५) आणि इंदू खरे (४०) या दोघींना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून ३० ते ३५ वर्षीय महिलांची सुटका करण्यात आली आहे. दलाल म्हणून काम करणारी सुमित्रा गरीब, गरजू महिलांना हेरून त्यांना चांगल्या नोकरीचे आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांना या वाममार्गाला लावत होती. पायाने अपंग असलेली इंदू मात्र हा कुंटणखाना चालवत होती. निवासी भाग असूनही या इमारतीमधील अनेकांना हा प्रकार माहीत नव्हता. काहींना केवळ या प्रकाराचा संशय येत होता. सुमित्रा आणि इंदू यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, या सर्व प्रकाराचा तपास श्रीनगर आणि एएचटीसी विभागाकडून सुरू आहे. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकल्यानंतर घराचे जे करारपत्र त्यांच्या हाती लागले, त्यावरून मालकाची चौकशी केली. आपल्याला या प्रकाराची काहीच माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
किसननगरातील भाडयाच्या घरात सुरु होता कुंटणखाना : घरमालक अनभिज्ञच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:49 IST
एका अपंग महिलेने गरजेपोटी भाडयाने घेतलेल्या घरात कुंटणखाना सुरु असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री किसननगर क्रमांक तीन येथे उघड झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या धाडीत या प्रकाराचा पर्दाफाश झाला.
किसननगरातील भाडयाच्या घरात सुरु होता कुंटणखाना : घरमालक अनभिज्ञच
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईघरमालकाची झाली चौकशी अपंग महिलेकडून सुरु होता कुंटणखाना