शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कल्याण-डोंबिवलीत १ मेपासून घरगणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:34 IST

आयुक्तांकडून आढावा; फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रत्यक्ष जनगणना, मसुरी येथे झाले होते प्रशासकीय प्रशिक्षण

कल्याण : जनगणनेच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका सज्ज झाली आहे. १ मे ते १५ जून २०२० दरम्यान पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार केली जाणार आहे. तर, त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना २०२१ मध्ये फेब्रुवारीत केली जाणार आहे. या जनगणना कार्यक्रमाचा आढावा सोमवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला.मसुरी येथील प्रशासकीय प्रशिक्षणानंतर बोडके यांनी महापालिकेतील कामाचा साप्ताहिक आढावा सोमवारी महिनाभरानंतर घेतला. यावेळी जनगणनेच्या कामावर अधिक भर देण्यात आला. जनगणनेच्या कामसाठी मालमत्ता विभागाचे करसंचालक विनय कुळकर्णी यांना पुण्यातील यशदा प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. सहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर कुळकर्णी यांनी जनगणनेच्या कामाची माहिती आयुक्तांच्या बैठकीत दिली.२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीत २७ गावे धरून १५ लाख लोकसंख्या होती. त्यानंतर, आता २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मागील १० वर्षांतील लोकसंख्यावाढीचा दर पाहता, महापालिका हद्दीत २०११ च्या १५ लाखांच्या लोकसंख्येत पाच लाखांनी वाढ अपेक्षित आहे.महापालिका हद्दीतील जनगणनेसाठी तीन हजार प्रगणक आणि ५०० पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका कर्मचारी, महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, खाजगी व अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.जनगणनेच्या आधी १ मे ते १५ जून २०२० या ४५ दिवसांच्या कालावधीत महापालिका हद्दीतील घरांची यादी तयार केली जाईल. तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अद्ययावत केले जाईल. २०११ च्या जनगणनेनंतर २०१५ मध्ये रजिस्टर अद्ययावत करण्यात आले होते. मुख्य गणना अधिकारी म्हणून बोडके हे काम पाहतील. तर, शहर गणक म्हणून सामान्य प्रशासन उपायुक्त हे काम पाहतील. महापालिकेतील १० प्रभाग क्षेत्रांमधील १० प्रभाग अधिकाऱ्यांना चार्ज अधिकारी म्हणून काम पाहावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रगणकाचे गट तयार केले जाणार आहेत.त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्व्हेअर व लिपिक घेतले जाणार आहेत. एका गटात १५० कुटुंबे असतील. त्यांची लोकसंख्या किमान ७५० अशी असेल. प्रत्येक गटासाठी एक पर्यवेक्षक असेल. या गटांमार्फत इमारती व घरे यांना अनुक्रमांक दिले जाणार आहेत. जनगणनेचे काम प्रत्यक्ष लेखी स्वरूपात व अ‍ॅपद्वारे असे दोन्ही प्रकारे केले जाणार आहे. घरयादी तयार करून झाल्यावर प्रत्यक्ष शिरगणतीचे काम १ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान केले जाणार आहे.लोकसंख्या आणि विकासाचे गणित मांडून राबवणार विकास योजनामहापालिकेतील लोकसंख्या लक्षात घेऊन विकास योजना आखल्या जातात. २० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने पुढील नियोजन केले जाईल. तसेच या योजना राबविताना २० लाखांची लोकसंख्या आधारभूत धरली जाईल. गेल्या १० वर्षांत महापालिका हद्दीत पाच लाखांनी लोकसंख्या वाढली असेल, तर त्याचा ताण महापालिकेच्या नागरी सोयीसुविधांवर निर्माण झालेला आहे, हेही तितकेच खरे आहे.पाणीयोजना, मलनि:सारण, वाहतूक प्रश्न, घरांचे प्रश्न, खेळाच्या जागा, आरोग्यसेवा सुविधा, सुरक्षितता या विविध सेवांवर लोकसंख्यावाढीचा ताण पडतो. बेकायदा बांधकामांमुळे नियोजनाचा बोजवारा उडतो. मात्र, लोकसंख्या वाढलेली दिसून येते. नागरिकीकरण होऊन वस्ती दाट झाल्याचे दिसून येते. लोकसंख्येची घनता वाढीस लागलेली दिसून येत असली, तरी विकासाच्या योजना त्या प्रमाणात दिसून येत नाहीत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका