शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची घरीच शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:38 IST

सरावासाठी साप्ताहिक पुस्तिकाही तयार केली आहे.

सुरेश काटे तलासरी : कोरोनामुळे सगळेच ठप्प झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्याकडे नेट आणि आॅनलाइन शिक्षणासाठी उपकरणे आहेत, त्यांचे शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, ज्यांच्याकडे काहीच सुविधा नाही त्यांचे काय, असा प्रश्न होता. तलासरी तालुक्यातील शिक्षकांनी या मुलांचेही शिक्षण थांबवलेले नाही. अशा मुलांच्या घरी जाऊ न त्यांना शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. तसेच, सरावासाठी साप्ताहिक पुस्तिकाही तयार केली आहे.

१५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून राज्य शासनाने अध्यादेश काढून ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व शिक्षक ‘वर्क फ्रॉम होम’साठी झपाटून कामाला लागले आहेत. तलासरी तालुक्यातील सर्व १५४ शाळा बंद आहेत. मात्र, येथील शिक्षकांनी विविध मार्गांनी ज्ञानार्जनाचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गाचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपद्वारे विविध प्रकारचे अ‍ॅप्स पालकांना डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. त्याद्वारे तसेच पीडीएफ पाठवून अध्यापनाचे काम सुरू आहे. काही पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे त्या मुलांची समस्या शिक्षकांना सतावत होती. त्यांच्यासाठी एक साप्ताहिक छोटीशी स्वाध्याय पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

गरीब मुलांसाठी उपयुक्त : जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांनी नुकतीच तलासरी तालुक्याला भेट दिली. वृक्षारोपण, पटनोंदणी व शाळा बंद, पण शिक्षण सुरू या कार्यक्रमाचा आढावा घेऊन सर्व शिक्षकांचे कौतुक केले. जोपर्यंत शाळा चालू होणार नाहीत, तोपर्यंत हे शिक्षण असेच चालू राहील, असा निर्धार तालुक्यातील सर्व शिक्षकांनी केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण