शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हाजुरी क्लस्टरमध्ये १,००१ जणांना घरकुल; ठाणे महापालिकेने संकेतस्थळावर केली प्रसिद्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:40 IST

अंतिम यादी तयार : ठामपाने क्लस्टर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर, राबोडी या परिसरांची प्राधान्याने निवड केली आहे.

ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेल्या क्लस्टर योजनेला आता पाच महिन्यांनंतर चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे. आझादनगर येथील बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या हाजुरी येथील क्लस्टर योजनेतील १,००१ लाभार्थ्यांची अंतिम यादी ठामपाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 

ठामपाने क्लस्टर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर, राबोडी या परिसरांची प्राधान्याने निवड केली आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये  क्रीडांगण, सांस्कृतिक केंद्र, सुरक्षा,  कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाउन सेंटर अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या परिसरातील क्लस्टर योजनेचा विकास प्रामुख्याने भूखंडधारकांच्या, भोगवटाधारकांच्या गृहनिर्माण संस्थेमार्फत  करण्यात येणार आहे. येथील रहिवासी अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करत असले, तरीही नियमावलीत ते पात्र ठरल्यास त्यांना राहत्या घराइतके घर पुनर्विकासात मिळणार आहे. योजना ही प्रामुख्याने भूखंडधारक, भोगवटाधारकांची गृहनिर्माण संस्था यांच्यामार्फत होणार असून घरांचा ताबा  त्यांना मिळणार आहे.

हरकती ऐकल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्धमहापालिकेने हाजुरी येथील सर्वेक्षण पूर्ण केले असून १,००१ रहिवाशांची यादी तयार केली आहे. लाभार्थ्यांची पहिली यादी मे २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती, सूचना घेतल्यानंतर ३० जानेवारीला अंतिम यादी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. या अंतिम यादीला महापालिकेची मंजुरी मिळाली असून लाभार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या माहितीसाठी ती नोटीसद्वारे प्रसिद्ध केली आहे. संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध केलेली यादी ही नागरी समूह विकास योजनेकरिता अंतिम असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका