शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांना हवीय बदलीपर्यंत सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:31 IST

अधिकाऱ्यांतील वादामुळे नाराज; थेट मंत्रालयात पाठविला अर्ज

ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उडालेल्या खटक्यानंतर आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी थेट मंत्रालयात मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडे अर्ज पाठवून बदली मिळत नाही, तोपर्यंत सुटी मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. आयुक्त थेट दीर्घकालीन रजेवर गेल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.मागील आठवड्यात महापालिकेत पालिका प्रशासनात व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजवरून चांगलाच गदारोळ झाला होता. तेव्हापासून आयुक्तांनी महापालिकेत प्रवेश केला नव्हता. मात्र, मंगळवारी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत खेळीमेळीचे वातावरण होते, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेतील उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केल्या. सत्ताधारी शिवसेनेला डावलून त्या केल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करून त्या रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले होते. यामुळे अस्वस्थ असलेल्या आयुक्तांनी बदलीच्या मागणीचे पत्र पाठवले आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती ओळखले जाणारे आयुक्त जयस्वाल यांचा गेल्या जानेवारी महिन्यातच महापालिकेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची कधी बदली होणार, अशी चर्चा शहरात सुरू होती. मात्र, ठाणे शहरातील बहुचर्चीत क्लस्टर योजनेची पायाभरणी तातडीने व्हावी, यासाठी आग्रही असलेले राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांना अघोषित मुदतवाढ देऊ केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यातील क्लस्टरसह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आयुक्त जयस्वाल हे पुढे होते.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका