शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी यंदाही टँकर नाहीत, नैसर्गिक पद्धतीने सण साजरा करा; ठाणे महापालिकेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:40 IST

ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

ठाणे : ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. होळी सणासाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे टँकर देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होतो. त्यामुळे या दिवशी कोणालाही पाण्याचे टँकर न पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच शहरातील सर्व्हिस स्टेशनलाही तशा सूचना देण्याविषयी त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना निर्देशित केले आहे. ठाणे हे सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक परंपरा जपणारे शहर आहे. ही परंपरा अधिक समृद्ध आणि आरोग्यदायी व्हावी यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर करू नये, वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये तसेच नैसर्गिक पद्धतीने होळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.पिशव्यांची सर्रास विक्री-पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी शहराच्या विविध भागात खास करून झोपडपट्टी भागात आजही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात असून सर्रासपणे या पिशव्यी विकल्या जात असल्याचे दिसत आहे. यामुळे पालिका त्यावर कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.होळीच्या काळात पाण्याचा अधिक अपव्यय होत असतो. त्यातही मागील काही वर्षात मोठ्या रंगपंचमींच्या ठिकाणी पालिकेचे टँकर घेऊन हा सण साजरा करण्याची प्रथा होती. परंतु,मागील काही वर्षांत पावसाने पाठ फिरविल्याने टँकरच्या वापराबाबत काही दक्ष नागरिकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर पालिकेने मागील चार वर्षांपासून ते न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदादेखील त्याच धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८thaneठाणे