शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये होळी, धूलिवंदनावर बंदी; कोरोनाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:01 IST

पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत

मीरा रोड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने होळी व धूलिवंदनासाठी २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घरीच सण साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी झाडे, लाकडे तोडणे व त्याचे दहन करणे, पादचाऱ्यांवर रंग, पाणी व फुगे फेकणे, पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणे, अश्लील शब्द व घोषणा देणे, विकृत हावभाव करणे आदी कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, रिसॉर्ट, सभागृहामध्ये धूलिवंदन-होळी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून पोलिसांनी मनाई आदेश लागू केले असून सण साधेपणाने घरच्या घरी साजरे करण्याचे आवाहन महानगरपालिकेसह पोलिसांनीही केले आहे. या आदेशांचे उल्लंघन करुन जमावाने होळी साजरी केल्यास गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

आवाहनाचा परिणामहोळी, धूलिवंदन जवळ आले की दुकानांमध्ये पिचकारी, रंग यांच्या खरेदीसाठी गर्दी होते; परंतु होळीला केवळ तीन दिवस शिल्लक असले तरी दुकानांत शुकशुकाट आहे, फार कमी लोक खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यातच कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता महानगरपालिकेने होळी घरातच साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्याचाही परिणाम होऊन यंदा रंग, पिचकारींची विक्री अत्यल्प प्रमाणात होत असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Holiहोळीcorona virusकोरोना वायरस बातम्या