शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

छंद प्रेमींनी अनुभवले ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन, राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:46 IST

सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी सलग 14 दिवस मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली.

ठळक मुद्देफेसबुक लाईव्ह माध्यमातून ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शनसह्याजीराव सतीश चाफेकर यांनी उलगडला प्रवासराजकारण्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता

ठाणे : लॉकडाऊनमुळे प्रथमच छंद प्रेमींनी ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन अनुभवले. लागोपाठ पाच वेळा लिम्का रेकॉर्डचे मानकरी ठरलेले ठाण्याचे सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी आपल्या 51 वर्षांच्या सह्यांच्या दुनियेचा प्रवास फेसबुक लाईव्ह माध्यमातून छंद प्रेमींसमोर उलगडला. याचबरोबर प्रत्येक स्वाक्षरीची त्यांनी सविस्तर माहिती सलग १४ भागांतून दिली. इंदिरा गांधी , जवाहरलाल नेहरू, नरेंद्र मोदी , शरद पवार यांच्या स्वाक्षऱ्याबद्दल प्रेक्षकांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले तर बाळासाहेब ठाकरे यांची स्वाक्षरी केलेली एकमेव बॅट पाहून अनेकजण अक्षरशः आश्चर्यचकित झाले.             १५ जून ते २८ जून या कालावधीत फेसबुकवर त्यांनी स्वाक्षऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना सांगितला. ज्यांना जागेची व पैशांची अडचण आहे ते भविष्यात अशा प्रकारे लाईव्ह प्रदर्शन करू शकतात असे चाफेकर यांनी लोकमतला सांगितले. बऱ्याच स्वाक्षऱ्या कशा मिळवल्या आणि स्वाक्षरी आणि माणसाचा स्वभाव यावरही त्यांनी  मार्गदर्शन केले.नवीन लोकांकडून राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल उत्सुकता असल्याचे निरीक्षण चाफेकर यांनी नोंदविले. तसेच, प्रत्येकाला स्वतःच्या स्वाक्षरीबद्दल कुतुहल होते, त्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, आपल्या स्वाक्षऱ्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना स्वाक्षऱ्या व्हाट्सएप आणि इ मेलवर प्रेक्षकांनी पाठविल्या.   वर्ल्ड कप १९८३ च्या सामन्यात खेळलेले बलविंदर सिंग संधू, क्रिकेटर रॉबिन मॉरिस, भारतीय संघात १९७१ मध्ये कसोटी सामना खेळलेले के. जयंतीलाल यांनी देखील हे प्रदर्शन लाईव्ह पाहून कौतुक केले तर दुसरीकडे प्रवीण दवणे ,चंद्रशेखर टिळक , सचिदानंद शेवडे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात  सर डॉन ब्रॅडमन , सचिन तेंडुलकर, गॅरी सोबर्स, एकनाथ सोलकर , कपिल देव, राहुल द्रविड यांच्यापासून अनेक क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या दाखऊन आपले अनुभव ही सांगितले.. जवळजवळ त्यांनी ३०० च्या आसपास क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या बॅट्स वर पहिल्या. आचार्य अत्रे,  श्यामची आई या चित्रपटात श्यामच्या आईचे काम केलेल्या वनमाला तर श्यामचे काम करणारे माधव वझे यांची स्वाक्षरी तसेच, किशोरी आमोणकर , पंडित भीमसेन जोशी, कवी सोपानदेव चौधरी, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर , अभिनेते  धर्मेंद्र , अमिताभ बच्चन , वहिदा रहेमान , मुबारक बेगम, अशा भोसले,  यांच्याही स्वाक्षऱ्या त्यांनी दाखविल्या.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकExhibitionप्रदर्शन