शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयास दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:55 IST

कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द : केडीएमसीकडे आल्या होत्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीने अधिग्रहित केलेल्या पश्चिमेतील चिकनघर येथील ए अ‍ॅण्ड जी या खासगी कोविड रुग्णालयाने रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारल्याने प्रशासनाने त्यांची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे अन्य रुग्णालयांचे धाबे दणाणले आहे.केडीएमसीकडे केवळ दोन मोठी रुग्णालये असल्याने वाढत्या रुग्णसंख्येला तोंड देण्यासाठी प्रशासनाने महापालिका हद्दीतील २४ खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. या रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करताना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या आरोग्य सेवा दर सूचीनुसार उपचाराचे बिल आकारायचे आहे. मात्र, खासगी अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांकडून जास्तीचे बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त होत होत्या. महापालिकेने त्यासाठी भरारी पथक नेमले होते. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयात कर्मचारी नेमला होता. या कर्मचाºयाने बिलाची शहानिशा केल्यावर रुग्णाने बिल भरावे, असे आयुक्तांनी सूचित केले होते.ए अ‍ॅण्ड जी या खासगी रुग्णालयात ३५ बेड होते. या रुग्णालयाच्या विरोधात जास्तीचे बिल आकारले गेल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. १९ प्रकरणांमध्ये या रुग्णालयाने नऊ लाख ३६ हजार रुपयांचे जास्तीचे बिल आकारल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. रजिस्ट्रेशन, ईसीजी, आॅक्सिजन यासाठी वेगळे दर आकारण्यात येत होते. रुग्णांना १२ हजार रुपयांचे पॅकेज सांगितले जात होते. टोसिलीझुमॅब इंजेक्शन रुग्णाला देताना त्यावरील एमआरपी दरापेक्षा जास्त दर आकारला जात होता. रुग्णालयात बेडची उपलब्धता किती आहे, त्याची आॅनलाइन माहिती उपलब्ध करून दिली जात नव्हती. या प्रकरणी महापालिकेने ६ जुलैला रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रुग्णालयाकडून विहीत वेळेत खुलासा आला नाही. पाठपुरावा केल्यावर दिलेला खुलासा समर्पक नाही. या सगळ्या प्रकारात कोविड काळात रुग्णांचे आरोग्य, सार्वजनिक व आर्थिक हित जोपासण्यास असमर्थ ठरलेल्या रुग्णालयाची कोविड मान्यता आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रद्द केली आहे. या कारवाईनंतर महापालिकेने अधिग्रहित केलेल्या अन्य कोविड रुग्णालयांनी धसका घेतला आहे.‘नोटीस अद्यापमिळालेली नाही’यासंदर्भात ए अ‍ॅण्ड जी रुग्णालयाशी संपर्क साधला असता तेथे जबाबदार व्यक्ती प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, तेथील डॉक्टरांनी केडीएमसीने अशा प्रकारची कारवाई केल्याची नोटीस अद्याप तरी आपणास प्राप्त झालेली नाही, असे सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस