शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ऐतिहासिक 'वसई किल्ला' बनला मद्यपींचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:52 IST

पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण  ठरलेला, चारशे वर्षांचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन 'वसई किल्ला' सध्या मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. यावर पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक मद्यपींचा राबता वाढला आहे. विशेष म्हणजे या भागात गैर कृत्य होऊ नये म्हणून पुरातत्व विभागामार्फत १२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. तरीही राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असतात. नव्याने घडलेल्या घटनेत अशीच मद्य मैफील शिवसैनिकांनी उधळून लावलेली आहे. 

अधिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर नजीक बालेकिल्ला येथे काही मद्यपी मद्यपान करीत असल्याची माहिती वसईतील (उबाठा गट) शिवसैनिकांना प्राप्त झाली. त्याची खातरजमा करण्यासाठी कोर्ट नाका विभाग प्रमुख दत्ता जाधव, उमेळा विभाग प्रमुख राकेश कदम यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता, पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर ऐतिहासिक बालेकिल्ल्याच्या वरच्या बाजूस मद्यपींची मैफिल रंगलेली दिसली. 

यावर आक्षेप घेत सदर मद्यपींना वसई पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. आरोपी पैकी विक्रम दुबे (२७) व अन्य तीन यांना अटक करून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार कोकरे करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार