शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमण शिबिरातील घरे बाधितांनीच दिली भाड्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:08 IST

बीएसयूपी प्रकल्पातील किंवा अन्य विस्थापितांना पालिकेने दिलेली भाड्याची घरे इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आलेला असताना ब्रह्मांड येथील संक्रमण शिबिराची सात

ठाणे : बीएसयूपी प्रकल्पातील किंवा अन्य विस्थापितांना पालिकेने दिलेली भाड्याची घरे इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आलेला असताना ब्रह्मांड येथील संक्रमण शिबिराची सात मजल्याची अख्खी इमारतच कोपरीतील विस्थापितांनी भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या इमारतीत गेली चार वर्षे भाडेतत्वावर रहिवासी आहेत आणि एकाने काही महिन्यांपूर्वी या इमारतीतील घर विकून टाकले.कोपरीच्या सिध्दार्थनगर भागात बीएसयूपीच्या इमारती उभारण्यात येणार होत्या. त्यातील काहींची कामे पूर्ण झाली असून काही सुरु आहेत. तेथील बाधीतांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरुपात विविध संक्रमण शिबिरात केले होते. ब्रह्मांड येथील निशा टीएमसी या इमारतीत अशाच काही जणांचे पुनर्वसन करण्यात आले होते. ही इमारत साधारणपणे सात ते आठ वर्षापूर्वी उभारण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गुरूवारी सकाळी या इमारतीची पाहणी केली, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.तळ अधिक सात मजल्याच्या या इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट असे ३२ फ्लॅट आहेत. त्यातील पाच फ्लॅट पालिकेच्या कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. उर्वरित ९५ टक्के फ्लॅट हे प्रकल्पग्रस्तांनी गेली चार वर्षे भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पहिल्या मजल्यावर पेस्ट कंट्रोल कंपनीचे आॅफिस थाटण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावर काही रहिवासी चार वर्षापासून, काही दोन; तर काही पाच महिन्यांपासून भाड्याने राहत आहेत.मालकच ठावूक नाहीसध्या तेथे राहणाºया पोटभाडेकरूंना ही घरे कोणाला दिली होती, कशासाठी दिली होती, याची माहिती नाही. अनेकांना तर घर कोणाकडून भाड्याने घेतले आहे हेही ठावूक नाही.भाड्याचा दरही वेगवेगळाप्रत्येक मजल्यावरच्या किंवा आजूबाजूच्या फ्लॅटच्या भाड्याचा दर वेगवेगळा असल्याचे पाहणीत दिसून आले. काही जण ७५००, तर कोणी ६५००, तर काही जण सहा हजार भाडे मोजत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांनी पोट भाडेकरूंकडून तीन ते चार लाखांची कमाई केल्याचे उघड झाले.इमारतीची अवस्था दयनीयविकासकाची इमारत पालिकेकडे देताना उत्तम होती, पण तिचा अजिबात मेटेनेन्स झालेला नाही. सांडपाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. पॅसेजमध्ये विजेचीही सोय नाही. अनेक मजल्यांवर घाण साठली आहे, तर मागील बाजूसही कचरा-घाणीचे साम्राज्य आहे. पण पालिकेनेही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.पालिकेचे कानावर हातया इमारतीमधील घरे कोणासाठी दिली होती, ते तेथे राहतात का, याची माहितीच पालिकेकडे नसल्याचे उघड झाले. प्रकल्पग्रस्तांनी त्यांना दिलेल्या तात्पुरत्या घरात पोटभाडेकरू ठेवले असतील, तर ही घरे ताब्यात घेतली जातील, असे जरी पालिका बजावत असली तरी ते चार वर्षांत झालेले नाही. यापूवी भाड्याची घरे दुसºयांना भाड्याने देणाºयांवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल गुन्हे दाखल केले होते. त्यांची घरे काढून घेतली होती. तशीच कारवाई येथे होणार का, हा प्रश्न आहे.अन्य नगरसेवकांचे दबावतंत्रकोपरीतील नगरसेवकांना या पाहणीची माहिती कळताच त्यांनी फोन करुन घेर भाड्याने देणाºयांची बाजू घेतली. या रहिवाशांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना शाळा, कामाचे ठिकाण आणि इतर सोई-सुविधा जवळ मिळत नव्हत्या. म्हणून त्यांनी घरे भाड्याने दिल्याची कबुली देत अप्रत्यक्षपणे हा प्रकार ठावूक असल्याचे दाखवून दिले.करारनामाही धक्कादायक : ही घरे पालिकेने प्रकल्पग्रस्तांना दिली होती, त्यांनी ती दुसºयांना भाड्याने देतांना केलेला करारनामाही धक्कादायक आहे. त्यात प्रकल्पग्रस्ताने मला सध्या या घराची गरज नसल्याचे म्हटले आहे. या व्यक्ती विस्थापित झाल्या, त्यांना रहायला घर नाही म्हणून पालिकेने त्यांना हे घर दिलेले असताना त्यांनी या घराची गरज नसल्याने भाड्याने देत असल्याचे करार केले आहेत. ज्याला भाड्याने दिले, त्याला तातडीची गरज असल्याने मी हे घर ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने देत असल्याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात करण्यात आला आहे.