शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अपहृत आशिकची आठ दिवसांत झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:32 IST

३ जुन रोजी रात्री आशिक हा धामणकरनाका पुलाखाली आईच्या कुशीमध्ये तो झोपला होता

ठाणे : भिवंडीतून अपहरण झालेल्या एक वर्षीय आशिक (बाबू) चंदुल हरजन याच्या अपहरणप्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने रोहित प्रदीप कोटेकर (२३) याला उत्तरप्रदेशातून अटक करून हा गुन्हा आठ दिवसात उघडकीस आणला. तर त्याचा साथीदार सुरज सोनी हा फरार आहे. हे दोघेही सराईत वाहनचोरटे आहेत. झालेले कर्ज फेडण्याकरीता हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. बुधवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते आशिकला आईवडिलांच्या स्वाधीन केले.

३ जुन रोजी रात्री आशिक हा धामणकरनाका पुलाखाली आईच्या कुशीमध्ये तो झोपला होता. याचदरम्यान फरार सुरज याने अटकेतील रोहित याच्या सांगण्यावरून त्याचे अपहरण केले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भिवंडीतील नंदीनाका येथील रोहित कोटेकर याला सोमवारी १० जुलै रोजी सकाळी अटक केली. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार व वाहन चोरी करणारा रेकॉर्डवरील सुरज सोनी याच्या मदतीने केल्याची कबुली देऊन ३ ते ४ लाखांचे कर्ज फेडण्याकरिता हा गुन्हा केल्याचे म्हटले आहे. त्याला येत्या १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस नाईक मेघना कुंभार या पथकाने उत्तरप्रदेशातील महाराजगंज येथे धाव घेऊन कारवाई केली होती.आशिकला विकण्याचा आरोपींचा होता कटएक महिलेला मूलबाळ होत नसल्याने तिने आरोपींक डे मूल दत्तक घ्यायचे आहे असे सांगितले. दरम्यान, त्यांनी आशिकचे अपहरण करून त्याला विकण्याची तयारी केली होती. मात्र, तत्पूर्वी तो पोलिसांच्या जाळ्यात आला. रोहित हा आशिकला किती रुपयांना विकणार होणार होता हे तपासात कळेल.हरजन कुटुंबीय फैजाबादचेहरजन कुटूंबिय हे फैजाबादचे असून तीन ते चार वर्षांपासून भिवंडीत रमजान ईदच्या दिवसात उदरनिर्वाहासाठी येतात. या ते दिवसात सात ते आठ हजार रुपये कमाई करतात.भिवंडी ते उत्तरप्रदेश प्रवासआशिकच्या अपहरणानंतर त्याच दिवशी रोहितने त्याच्यासह उत्तरप्रदेश गाठले. तेथे त्याने ज्या महिलेला मूलबाळ होत नव्हते तिच्याकडे या घटनेनंतर त्यास ठेवले होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस