शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा गेल्या २१ वर्षातील जुलै अखेरीस १०० कोटींच्या कर वसुलीचा उच्चांक 

By धीरज परब | Updated: August 1, 2023 20:04 IST

मीरा भाईंदर महापालिका स्थापन झाल्या पासूनचा गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत जुलै अखेरीस १०० कोटींचा कर वसुलीचा आकडा ओलांडण्याचा उच्चांक यंदा महापालिकेने गाठला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका स्थापन झाल्या पासूनचा गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत जुलै अखेरीस १०० कोटींचा कर वसुलीचा आकडा ओलांडण्याचा उच्चांक यंदा महापालिकेने गाठला आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी पाठपुरावा तसेच जून व जुलै महिन्यात कर सवलत उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

गेल्या वर्षी ३१ जुलै पर्यंत महापालिकेने ७५ कोटींची कर वसुली केली होती. यंदा मात्र १०२ कोटी १६ लाख इतकी मालमत्ता कर वसुली या कालावधीत झाली आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी महापालिका कार्यालयात जाणे व रांगा लावणे ह्या कटकटीतून सुटका करण्यासाठी ऑनलाईन कर भरणा सुरु करण्यात आला. 

आयुक्त दिलीप ढोले यांनी कर भरण्यासाठी नागरिकांना अद्यावत पालिका संकेतस्थळ व माय एमबीएमसी मोबाईल ॲप चा वापर करण्याचे आवाहन केले होते. ऑनलाईन कर भरल्यास जून महिन्यात ५ टक्के तर जुलै महिन्यात ३ टक्के सवलत आयुक्तांनी जाहीर केली होती. 

यंदा अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, सिस्टम मॅनेजर राज घरत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे सह सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना मालमत्ता कर वसुली वेगाने करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. 

एकूण १ लाख ८९ हजार १२३ मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. ७६, ३५१ नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरत ४० कोटी ४३ लाख ५ हजार रुपये जमा केले आहेत. तर १ लाख १२ हजार ७७२ नागरिकांनी रोख रक्कम, चेक व डिमांड ड्राफ्टद्वारे एकूण ६१ कोटी ७३ लाख इतका मालमत्ता कर भरला आहे.  जून महिन्यात ५ टक्के सवलत योजनेचा १ लाख ३७ हजार ७२२ नागरिकांनी तर जुलै महिन्यात ३ टक्के सवलत योजनेचा ५१ हजार ८६४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. 

यंदा ३१ जुलै पर्यंत प्रथमच विक्रमी मालमत्ता कर वसुली झाल्याचे सांगत आयुक्त  दिलीप ढोले यांनी करदात्या नागरिकां सह महापालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. तर ज्या मालमत्ता धारकांनी कर भरला नाही त्यांना एप्रिल, मे, जून व जुलै चे प्रती महिना २ टक्के व्याज लागणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर