शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महसूल, पोलीस खात्यामध्ये लाचखोरांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:50 IST

सर्वाधिक ट्रॅप महसूल विभागात : चाळिशीतील कर्मचारी सर्वाधिक

जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दोन महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध १२२ सापळे रचले. यात महसूल आणि पोलीस खाते अव्वल असून, त्यापाठोपाठ महावितरणचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे चाळिशीतील कर्मचारी-अधिकारी यांची संख्या यात मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये १२२ सापळे लावले, तर २०२० या संपूर्ण वर्षभरात ६३० सापळे लावण्यात आले. यात बारा अपसंपदा, तर २१ अन्य भ्रष्टाचाराची प्रकरणे होती. ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये नऊ गुन्ह्यांत १२ लाचखोरांना अटक झाली. यात महसूल विभागात २५, पोलीस २५, तर महावितरण कंपनीच्या १६ प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिका आठ, जिल्हा परिषद तीन, पंचायत समिती दहा तर वनविभागाच्या पाच प्रकरणांचा समावेश असून, प्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन प्रकरणांचा समावेश आहे.

चाळिशीतील सरकारी अधिकाऱ्यांना पैशाचा मोहकोरोनामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या काळात लॉकडाऊन असल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळही कमी होती. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावलेली होती. त्यामुळेच या कालावधीमध्ये म्हणजे गेल्या दहा महिन्यांत लाचेचा एकही सापळा लागलेला नाही.मात्र, लॉकडाऊन संपताच जानेवारी २०२१ मध्ये ६८ सापळ्यांमध्ये ९६, तर फेब्रुवारीमध्ये ५३ सापळ्यांमध्ये ७३ जणांना अटक झाली आहे.वयोगटानुसार आढावा घेतल्यास सर्वाधिक पैशाचा मोह हा चाळिशी ओलांडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना असल्याचे आढळले. २०१९मध्ये ही संख्या ६० तर २०२० मध्ये १६ आणि २०२१च्या दोन महिन्यांमध्ये ४१ ते ५० वयोगटातील चौघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली.त्यापाठोपाठ तिशी ओलांडलेल्या म्हणजे ३१ ते ४० वयोगटातील ६७ लाचखोर पकडले गेले. २०१९मध्ये ३६ तर २०२० मध्ये या वयोगटातील २९ लाचखोर अडकले आहेत.

भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) ध्येय आहे. कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असेल तर संबंधितांनी एसीबीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी कोणत्याही खात्याचा किंवा वयोगटाचा असो त्यावर कारवाई होईल. यात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.    - डॉ. पंजाबराव उगले,     पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र