शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हेरॉइन तस्करी : घरातच ‘तो’ करायचा अफूवर प्रक्रिया, मध्य प्रदेशात ठाणे पोलीस पुन्हा जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 20:07 IST

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील कम्मो अजिज खान हा अफूवर प्रक्रिया करून घरातच हेरॉइन बनवून त्याची तस्करी करत असल्याची माहिती ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या तपासात उघड झाली आहे.

ठाणे : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामाऊ परिसरातील कम्मो अजिज खान हा अफूवर प्रक्रिया करून घरातच हेरॉइन बनवून त्याची तस्करी करत असल्याची माहिती ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या तपासात उघड झाली आहे. त्याला लवकरच मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी याला गुन्हे अन्वेषण विभागाने ११ आॅक्टोबर रोजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्यापाठोपाठ त्याला हा माल पुरवणा-या गनी माऊ यालाही ठाणे पोलिसांनी १४ आॅक्टोबर रोजी मध्य प्रदेशातून अटक केली. अन्सारीकडून ३९ लाख २५ हजारांचे ३९२.५ ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत केले होते. गनीने हा माल कम्मो याच्याकडून खरेदी केल्याची माहिती आता तपासात उघड झाली आहे. तो घरातच अफूवर प्रक्रिया करून त्यातून काही रसायनांचे मिश्रण करून हेरॉइनची निर्मिती करतो. तोच गनीसह अनेक घाऊक विक्रेत्यांना हेरॉइनचा पुरवठा करतो. साधारण २५ लाखांमध्ये एका किलोच्या हेरॉइनचा सौदा होतो. पुढे अडीच हजारांमध्ये एक ग्रॅम याप्रमाणे त्याची विक्री केली जाते.दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या अन्सारी आणि गनी या दोघांनाही १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्यामुळे बुधवारी ठाणे न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कम्मो यालाही ताब्यात घेण्यासाठी पुन्हा ठाणे पोलिसांचे पथक आता मध्य प्रदेशात रवाना होणार आहे. या प्रकरणात त्याचा नेमक सहभाग किती आहे, त्याने घरातच हेरॉइनची निर्मिती केली किंवा कसे, या सर्व बाबींची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली.