शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

येथे ‘कर’ माझे जुळती

By admin | Updated: October 27, 2016 03:40 IST

अपंगांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘रोटरी क्लब आॅफ कल्याण’ आणि ‘जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने यंदा १३ नोव्हेंबरला कृत्रिम

- आमोद काटदरे,  ठाणे अपंगांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘रोटरी क्लब आॅफ कल्याण’ आणि ‘जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने यंदा १३ नोव्हेंबरला कृत्रिम हात दानाचा उपक्रम हाती घेतला आहे. खांद्यापासून खालील हात नसलेल्यांसाठी तसेच कोपरापासून खाली हात नसलेल्यांना ‘एल एन ४’ हा कृत्रिम हात पूर्णत: मोफत बसवून त्यांना स्वावलंबी करण्याचा निर्धार दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी केला आहे. या शिबिरासाठी राज्यासह परराज्यातील ३२५ रुग्णांनी नोंदणी केली आहे.कल्याणमधील रोटरी क्लबने मागील वर्षी त्यांच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पाय नसलेल्यांसाठी जयपूर फूट तर पाय लुळे पडलेल्यांसाठी कॅलिपर बसवण्याचा उपक्रम राबवला. त्यातून २१० रुग्णांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात रोटरी आणि जैन चॅरिटेबल ट्रस्टला यश आले. या शिबिराच्या वेळी हात नसलेल्या अपंगांचा प्रश्न समोर आल्याने त्यांनी यंदा अपंगांना हात बसवण्याचा उपक्रम हाती घेतला. शोधाशोध केल्यावर ‘रोटरी क्लब आॅफ पिनाया बेंगलोर’ आणि ‘रोटरी क्लब आॅफ पुणे डाऊन टाऊन’ त्यासाठी काम करत असल्याचे समजले. जुलैत कल्याण रोटरीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, प्रोजेक्ट मार्गदर्शक केदार पोंक्षे, प्रोजेक्ट-चेअरमन मदन शंकलेशा, प्रोजेक्ट संयोजक डॉ. सुश्रुत वैद्य, सेक्रेटरी चंद्रकांत बागरेचा, प्रोजेक्ट-विस्तारक प्रवीण कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुण्यातील रोटरीचे साबीरभाई जामनगरवाला यांची भेट घेतली. तेव्हापासून शिबिराचे नियोजन सुरू झाल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. कृत्रिम हात दानाच्या शिबिरासाठी त्यांनी पुन्हा कल्याण तालुक्यासोबतच परिसरात जागृती केली. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळेच ८० टक्के लाभार्थी संपर्कात आल्याचे ते म्हणाले. जालना, कराड, कोल्हापूरबरोबरच कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली येथील ३२५ अपंगांनी नोंदणी केली आहे. औद्योगिक कंपन्या तसेच शेतीत काम करताना झालेल्या अपघातामुळे काहींच्या हाताला इजा झाली. सात-आठ लहान मुलांनीही नोंदणी केली आहे. त्यांचे हात जन्मत:च अधू आहेत. कल्याणच्या ठाणकर पाड्यातील आग्रा रोडवरील महावीर जैन इंग्लिश स्कूलमध्ये १३ तारखेच्या शिबिरात त्यांना कृत्रिम हात बसवले जातील.खांद्याखाली हात नसलेले ७० अपंगांनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे. त्यांना माहीममधील डिस्ट्रिक्ट डिसअ‍ॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून हात उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही संस्था उदयपूरहून मापाप्रमाणे हात बनवून आणते. त्यासाठी लाभार्थींच्या हाताचे माप घेतल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. पुणे रोटरीचे १० सदस्य शिबिराच्या आदल्या दिवशी येऊन कल्याण रोटरीच्या सदस्यांना ‘एल एन ४’ हात बसवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यानुसार १३ तारखेला सकाळी ८ पासून लाभार्थींना हे हात बसवले जातील. हात नसलेल्यांना स्वावलंबी करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे पोंक्षे व डॉ. वैद्य म्हणाले.असा असतो कृत्रिम हात...अमेरिकेतील एलन मिडोज प्रॉस्थेटिक हँड फाऊंडेशनतर्फे जगभरातील गरजूंना कृत्रिम हातांचे वितरण केले जाते. कोपराखाली हात नसलेल्यांसाठी ‘एल एन ४’ हा कृत्रिम हात बसवला जातो. तो काढायला-लावायला अगदी सोपा-सुटसुटीत, मजबूत, टिकाऊ आणि बहुपयोगी आहे. ब्रास आणि स्टेनलेस स्टीलचे भाग वापरून उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून तो बनवलेला आहे. पाणी, धूळ, क्षार, उष्णता यांना दाद न देणारा हा हात साध्या पाण्यानेही साफ करता येतो. विशेष म्हणजे, अंदाजे ११-१२ किलो वजनही उचलण्याची या हाताची क्षमता आहे.या हाताची तीन बोटे स्थिर आहोत, तर दोन बोटे हलणारी आहेत. या हातावरील एक बटन दाबल्याने ही बोटे मिटण्याची-उघडण्याची क्रिया होते. ही बोटे एकमेकांत बसून वस्तू घट्ट पकडू शकतात. तसेच लिहिणे, सायकल-मोटरसायकल, कार चालवणे, हलके वजन उचलणे यासारखी कामेही करणे सहज शक्य आहे. या हाताचे वजन ४०० ग्रॅम आहे.