शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष; उद्यापासून पास मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 20:33 IST

वसई, विरार, नालासोपारा व नायगांव या चार रेल्वे स्थानकांमध्ये पालिकेचे ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे

आशिष राणे, वसई 

वसई विरार महापालिका प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील दोन डोस झालेल्या नागरिकांसाठी लोकल सेवेचा पास प्राप्त होणार आहे. वसई, विरार, नालासोपारा व नायगांव या चार रेल्वे स्थानकांमध्ये पालिकेचे ‘मदत कक्ष’ (Help Desk) स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना सदर सुविधेचा लाभ देण्यासाठी दि.11 ऑगस्ट, 2021 पासून सुरुवात होत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी लोकमत ला दिली आहे

या सुविधांचा नेमका लाभ व कुठं मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत यासाठी अफहिक माहिती देण्यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना दि 15 ऑगस्ट, 2021 पासून रेल्वे लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सदर प्रवासाची सुविधा ही फक्त मासिक पासवर (Monthly Season Tickets) प्रवास करण्यासाठी असेल. तसेच दैनंदिन प्रवास किंवा इतर प्रवासासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही असे ही स्पष्ट केले आहे.

दरम्यान नागरिकांना सदर सुविधेचा लाभ देण्यासाठी दि.11ऑगस्ट,2021 पासून वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील वसई, विरार, नालासोपारा व नायगांव या चार रेल्वे स्थानकांमध्ये महानगरपालिकेचे ‘मदत कक्ष’ (Help Desk) सकाळी ०7.०० ते रात्री 11.०० वाजेपर्यंत याकामी स्थापन करण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचा लाभ घेण्यासाठी मदत कक्षावर नागरिकांना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

लोकल पास सेवेसाठी ही असतील कागदपत्रे

1)  कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला असलेबाबतचे प्रमाणपत्राची (Vaccination Certificate) छायांकित प्रत  (zerox copy).  

2) फोटो असलेले मूळ ओळखपत्र (Original Photo ID) व त्याची छायांकित प्रत  (शक्यतो आधार कार्ड)

किंबहुना  वरील कागदपत्रांची ‘मदत कक्षा मार्फत’ तपासणी केल्यानंतर तपासणी केले बाबत कागदपत्रांवर विशेष शिक्का लावण्यात येईल. त्यानंतर सदर कागदपत्र रेल्वे तिकीट काऊंटरवर दाखवून प्रवाशांना मासिक पास खरेदी करता येईल.

कोणती काळजी व सूचना पाळाव्या लागतील

तर प्रवास करतेवेळी नागरिकांना 1)पास, 2) लसीकरणाचे प्रमाणपत्र व ३) ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील.  सदर सुविधेचा लाभ घेतेवेळी मदत कक्ष, रेल्वे तिकीट काऊंटरवर तसेच प्रत्यक्ष प्रवास करतेवेळी नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे तसेच शासनाने कोरोना संबंधी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे ही आवाहन वसई विरार शहर मनपा आयुक्तांनी या प्रसिद्धी पत्राद्वारे केलं आहे

 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलVasai Virarवसई विरार