शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी; भाजीपाला २० टक्के महाग; जांभळी नाका, गावदेवी मार्केटमध्ये आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:40 IST

या संपाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, संपामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला जांभळी नाका, गावदेवी मार्केट येथे आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले होते.

ठाणे : ‘हिट ॲण्ड रन’ कायद्याच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेला संप मागे घेतला असला तरी सर्वसामान्यांना आणखी एक ते दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ठाण्यातील पेट्रोल पंपांवर बुधवारी सकाळीही गर्दी होती. सकाळच्या पहिल्या सत्रात ज्या पंपांवर पेट्रोल मिळत होते, त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १ वाजेनंतर बहुतांश पंपांवर पेट्रोल आल्याने वाहनचालकांनाही काहीसा दिलासा मिळाला;  परंतु या संपाचा फटका भाजीपाल्याला बसला असून, संपामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेला जांभळी नाका, गावदेवी मार्केट येथे आवक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारले होते.

टँकर चालकांच्या संपानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. संप मागे घेतल्यानंतर आता ही गर्दी ओसरली आहे. सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी सकाळपासून सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मंगळवारी सायंकाळी संप मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर हळूहळू पेट्रोल पंपावरील वाहनांची गर्दी कमी झाली. आज दिवसभर सर्वच पेट्रोल पंपांवर नेहमीप्रमाणे तुरळक गर्दी दिसत होती.

वाटाणा १६० रुपये किलो-  या संपामुळे भाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली. ठाण्यातील बाजारात दिवसा ३०० ते ४०० गाड्या येतात. संपामुळे फक्त ५० ते १००  गाड्याच मार्केटमध्ये आल्या होत्या. -  त्यातही  वाटाणा हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशहून येत असल्याने या ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या बंद झाल्यामुळे सध्या असलेल्या  मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. -  ८० रुपये किलोने मिळणारा वाटाणा आता १६० रुपये किलो झाला आहे. बाकीच्या भाज्यांमध्ये १० ते २० टक्के वाढ झालेली आहे. -  सध्या भाज्यांचे दर वाढल्याने ग्राहकही कमी झाले आहेत, असे विक्रेते विजय पाटील यांनी सांगितले.

पेट्रोल संपल्याचे फलक पंपांवर-  संपामुळे शहरातील सर्व पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी मंगळवारी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. -  सर्वच पेट्रोलपंपांवर इंधन संपल्याने नागरिकांना भटकंती करावी लागली. संप मिटला तरीही बुधवारी पंपांवर पेट्रोल नसल्याचे फलक लावण्यात आले होते.  

टॅग्स :MarketबाजारthaneठाणेPetrolपेट्रोलInflationमहागाई