शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाचा पक्ष्यांना फटका, काही पक्षी परतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:28 IST

जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले.

- पंकज रोडेकर ठाणे : जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले. यामध्ये १७ घारी तर ९ घुबड यांच्यासह दोन गरुड, एक किंगफिशरसारख्या पक्ष्यासह पहिल्यांदाच पावसाळ्यात दाखल झालेल्या सहा कासवांचा समावेश आहे.ठाणे, घोडबंदर, डोंबिवली, विरार, मुलुंड आणि भांडुप या परिसरातील हे पक्षी असून २२ पक्ष्यांना येऊरच्या जंगलासह वेगवेगळ्या परिसरात सोडण्यात आले. यंदा मान्सूनपूर्व पावसापासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली.त्यातच जोरदार वाºयामुळे आणि पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले आहेत. त्यातच, निवारा नसल्याने पावसात भिजण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.पावसात भिजल्यावर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे काही पक्ष्यांना न्यूमोनियासारखा आजार होतो. पावसाने गारठलेल्या अवस्थेतील पशूंना पाहून प्राणिमित्र त्यांचे प्राण वाचवण्यासाठी ठाणे, ब्रह्मांड येथील पशुप्राण्यांवर उपचार करणाºया संस्थेत धाव घेत, त्यांना उपचारार्थ दाखल करतात.अशा प्रकारे १ जून ते १५ जुलैदरम्यान साधारणत: ४५ दुर्मीळ पशुपक्षी उपचारार्थ दाखल झाले असून त्यातील २२ पक्ष्यांना उपचारानंतर मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहेत. या दिवसांत जखमी होऊन दाखल झालेल्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने घुबड आणि घारींचा समावेश सर्वाधिक आहे. १७ घारी आणि ९ घुबडांसह सहा कासव, पाच पानबगळे आणि प्रत्येकी दोन कोकिळा, गरुड, मैना यांचा समावेश आहे.उर्वरित २३ पशुपक्ष्यांवर मागील काही दिवसांंपासून उपचार सुरू असून येत्या ८ ते १० दिवसांत त्यांना येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरातून आणले, त्यात्या परिसरात मुक्तसंचारासाठी सोडले जाणार आहे. मागील वर्षी याच दिवसांत ३० पक्षी दाखल झाले होते. यावर्षी ही संख्या वाढल्याचे उपचार करणाºया संस्थेतील डॉक्टरांनी सांगितले. या पक्ष्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.>पक्ष्यांच्या संख्येत वाढया पक्ष्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना शक्तिवर्धक टॉनिक, व्हिटॅमिनचे ड्रॉप पाजण्यात येत आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या रुग्णालयात वेळप्रसंगी जखमी झालेल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पशुपक्षी वैद्य डॉ. सुहास राणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा मात्र, अशा पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली.