शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातही पावसाची धुव्वाधार बॅटींग, अनेक ठिकाणी झाडांची पडझड, वाहनांचे नुकसान

By अजित मांडके | Updated: July 19, 2023 19:11 IST

याशिवाय उपवन तलावात पोहण्यासाठी उरलेल्या दोन तरुणांना वाचविण्यात टीडीआरएफच्या तुकडीला यश आले आहे. 

ठाणे :  मंगळवारी पावसाने मुसळधार सुरूवात केल्यानंतर दुपारनंतर विश्रांती घेतली होती. मात्र रात्री पासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. तर बुधवारी पहाटे पासूनच पावसाने ठाणे शहरालाही चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, २१ जुलैपर्यंत मुसळधार पावसाच्या इशाºयामुळे ठामपाची टीडीआरएफ आणि केंद्राची एनडीआरएफची टीम अलर्ट मोडवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. सात तासात ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेत तब्बल ३० तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये १२ तक्रारी या झाडे कोसळल्याचा आहेत. तर आठ ठिकाणी पाणी साचले असून दिवा आणि भाईंदर पाड्यात एकूण १५ घरांमध्ये पाणी शिरले होते. याशिवाय उपवन तलावात पोहण्यासाठी उरलेल्या दोन तरुणांना वाचविण्यात टीडीआरएफच्या तुकडीला यश आले आहे. 

एकीकडे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह शहरी भागात आपली दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. सातत्याने सुरू असलेल्या पावसाने वातावरणात गारवा आहे. गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ९०.०८ मीमी पावसाची नोंद झाली असताना, त्याच चोविसात आपत्ती व्यवस्थापन कक्षेत ३६ तक्रारींची नोंद झालेली आहे. यामध्ये १३ ठिकाणी झाडे पडलेली आहेत. यामध्ये काही झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली आहे. तर सहा ठिकाणी झाडाच्या फांदया तुटून पडल्या आहेत. दोन ठिकाणी पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय ३ ठिकाणी आग लागली होती. तर १० अन्य तक्रारींचा ही यामध्ये समावेश आहे.

बुधवारी पहाटे जोराचा वारा सुटला होता. मात्र सकाळी वाऱ्याचा जोर कमी झाल्यावर पावसाचा जोर वाढला. त्यातच सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे सात तासात ८०.०० मिमी नोंदवला गेला आहे. पहिल्या दोन तासात २२.६० मिमी पाऊस पडला. शेवटच्या दोन तासात म्हणजे साडेतीन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ३८.११ मिमी पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली आहे. तसेच या सात तासात तब्बल ३० तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये १२ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ५ ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून पडल्या आहेत. एका ठिकाणी आग लागली असून आठ ठिकाणी पाणी साचल्याची नोंद झाली आहे. तर सहा अन्य ही तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.आठ ठिकाणी पाणी साचल्याचा तक्रारीशहरातील वंदना टॉकीज या सखल भागासह कोपरी, सिद्धार्थनगर, दिवा धर्मवीर नगर, दिवा- मुंब्रा देवी कॉलनी, दिवा चंद्रायनी सोसायटी येथे, मुंब्रा शिबलीनगर, मुंब्रा- खान कंपाऊंड, वागळे इस्टेट नेहरूनगर आणि भाईंदर पाडा या ठिकाणी पाणी साचले.  दिवा, भाईंदर पाड्यात शिरले १५ घरात पाणीपाणी साचल्याचा तक्रारींमध्ये दिव्यातील धर्मवीर नगरमधील गटार चॉकअप झाल्याने कोकण विहार चाळी पाणी साचून ८ घरात पाणी शिरले होते. तसेच भाईंदर पाडा परिसरातील वाढवीपाड्यात ७ घरांमध्ये पाणी शिरले होते. अशाप्रकारे एकूण येवढ्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथे पाणी पंप पाण्याचा निचरा करण्यात आला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस