शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारा गेला चाळिशीपार! ठाणे ४३ अंशांवर, वाढत्या उकाड्याने ठाणेकरांची लाहीलाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:26 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.

ठाणे/मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही गेले तीन दिवस शहराचे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक दिसून आले आहे. बुधवारी शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले असून या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदल झाले. ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. यानंतर रात्री थंडी आणि दिवसा उष्मा असे वातावरण बदल दिसून आले, असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होऊन शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. शहरात १० एप्रिलला ४२.१ अंश सेल्सियस, तर ११ एप्रिलला ४२.८ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर बुधवारी म्हणजेच १२ एप्रिलला तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे. 

सकाळी १० पासूनच चटके     वाढत्या तापमानामुळे शहरात सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत हे वातावरण कायम असते. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.      यापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, स्कार्फ, टोपी, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. तसेच ताक, उसाचा रस, लिंबू सरबत असे पेय पीत असून यामुळे थंडपेयाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

मुंबईचा पारा ३६च्या पुढे ; पुढील पाच दिवस पावसाचेमुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असून, मुंबईचे कमाल तापमान आता ३६ अंशांपार गेले आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला असून, यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने अवकाळीचे संकट आणखी गहिरे झाले आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १४ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्टरत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार