शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे मुख्यालयच बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 06:24 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय, प्रशासकीय भवन, महापालिकेचेच अत्रे रंगमंदिर, डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझा बेकायदा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय, प्रशासकीय भवन, महापालिकेचेच अत्रे रंगमंदिर, डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझा बेकायदा असल्याचा धक्कादायक निष्कर्ष महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी नेमलेल्या अग्यार समितीच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल माहिती अधिकारात उघड झाला आहे.माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात हा अहवाल मिळविला आहे. अहवाल मिळविण्यासाठी विवेक कानडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने या अहवालाची प्रत घाणेकर यांना दिली आहे. घाणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अहवालातील मुद्दे, शिफारशी आणि धक्कादायक निष्कर्ष याची माहिती दिली. महापालिकेची इमारत कोणतीही परवानगी न घेता तसेच विकास आराखड्यातील तरतुदी व विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून बांधली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या जलद गती न्यायालयाची इमारतही विकास योजना रस्त्यात बांधली आहे. बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही, असा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. तसेच ४१६ रुग्णालयांपैकी केवळ ५४ रुग्णालये अधिकृत इमारतीत सुरू आहेत. तर उर्वरित रुग्णालये बेकायदा इमारतींत असल्याचेही या अहवालात नमूद केलेले आहे. बेकायदा बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे. घाणेकर हे क्रमांक दोनचे याचिकाकर्ते आहेत. याचिका न्यायप्रविष्ट असताना हा अहवाल उघड करणे योग्य आहे का, अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता याचिका व अहवाल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे ते म्हणाले.बेकायदा बांधकामासाठी जबाबदार असणारे तत्कालीन आयुक्त, वनअधिकारी, जिल्हाधिकारी, नगररचनाकार, प्रभाग अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. ३९५ विकासकांनी वारंवार बेकायदा बांधकामे केली आहेत.या विकासकांविरोधातदेखील एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे, अशा प्रकारची बेकायदा बांधकामे उभी राहण्यास मदत करणारे वास्तुविशारद, बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.