शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे मोबाइल सांभाळण्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:51 IST

मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा

पंकज रोडेकर  ठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्तगत केलेले जुने मोबाइल सांभाळणे आता एक नवी जबाबदारी पोलिसांच्या अंगावर येऊन पडली आहे. कारण, ते घेण्यासाठी तक्रारदार येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच हा इलेक्ट्रॉनिक कचरा नष्ट करण्यासाठी कोणतेही आदेश नसल्याने ती डोकेदुखीच ठाण्यासह इतरही रेल्वे पोलिसांना होऊन बसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दररोज चार ते पाच मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाइलचोरीबाबत ‘एफआयआर’ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच, मागील वर्षभरात ३००२ मोबाइलचोरीची नोंद झाली आहे. इतर गुन्ह्यांपेक्षा मोबाइलचोरीच्या या वाढत्या घटना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंगवर भर दिला. साध्या वेशातील पोलीस फलाटांवर तैनात केले. एवढेच नाहीतर रेकॉर्डवरील मोबाइलचोरट्यांची ‘टॉप २५’ ही यादी अद्ययावतही केली आहे. त्यामुळे या चोरीच्या घटना मध्यंतरी कमी झाल्या होत्या. पण, पुन्हा त्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासात चोरट्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून मोबाइल हस्तगतही केले जात आहेत. पण, हस्तगत होणाऱ्या मोबाइलमध्ये (अ‍ॅण्ड्राइड) स्मार्ट फोन असेल, तर तक्रारदार येऊन मोबाइल घेऊन जातात. पण, अ‍ॅण्ड्राइडपूर्वीचे मोबाइल घेण्यासाठी कोणी येत नाही. त्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जवळपास २०० जुने मोबाइल आहेत. तसेच ते नष्ट करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. यामुळे ते नष्टही करता येत नाही. त्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हे जुने मोबाइल सुरक्षेसह एका बॉक्समध्ये ठेवल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.