शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विमा कंपन्यांची उचलेगिरी पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:51 IST

दिवसेंदिवस वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे गुन्ह्यांचा आलेख ठाण्यात वाढताना दिसतो आहे.

- पंकज रोडेकरठाणे : दिवसेंदिवस वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे गुन्ह्यांचा आलेख ठाण्यात वाढताना दिसतो आहे. त्यातच या वाहनचोरीमुळे शहर पोलिसांची डोकेदुखी होऊन बसली आहे. या प्रकरणांचा तपास करताना, कळव्यात चोरीला गेलेल्या दोन दुचाकी इन्शुरन्स कंपन्यांनी उचलून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी अशा प्रकारे हप्ते चुकवेगिरी करणाऱ्यांच्या गाड्या उचलल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करावी, असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे.ठाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यंतरी सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढीस लागले होते. ते बºयाच प्रमाणात आटोक्यात येत आणताना दुसरीकडे वाहनचोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. वाहन खरेदी केल्यावर पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने बरेच जण ते सार्वजनिक रस्त्यांवर उभे करतात. ते करताना चालक ांकडून त्या वाहनाच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीच काळजी घेत नाही. त्यातच, दुश्मनीतून तसेच खोडसाळपणाने वाहने चोरून ती अज्ञातस्थळी अशी लांब नेतात आणि त्यातील पेट्रोल संपल्यावर ती गाडी बेवारस म्हणून तेथेच सोडून देतात. त्याचबरोबर हप्त्यावर वाहन घेतल्यावर त्याच्या हप्त्यांची चुकवेगिरी केल्यावर इन्शुरन्स कंपन्यांचे लोक हप्ते चुकवणाºयांमागे लागतात. त्यानंतर, ते वाहन कोणालाही काही माहिती न देता उचलून नेतात. अशा प्रकारे मागील महिन्यात कळवा पोलीस ठाण्यात दोन दुचाकी वाहने इन्शुरन्स कंपन्यांनी उचलून नेल्याची बाब त्या वाहनांचा तपास करताना पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. तत्पूर्वी अशा एका इन्शुरन्स कंपनीने तैनात केलेल्या लोकांनी हप्ते चुकवणाºयाचा पाठलाग सुरू केला होता. त्यावेळी अपघातही झाला होता. याप्रकरणी त्या लोकांवर कारवाई केली होती. कळवा पोलिसात दाखल झालेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एक चारचाकी वाहन खालापूर टोलनाका येथे अवस्थेत मिळून आले होते. तर, विटावा गेट येथून आणखी चारचाकी चोरीला गेली होती. ती कोणीतरी खोडसाळपणे त्याच परिसरातील एका पडक्या घरात पार्क करून ठेवल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.>चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात इन्शुरन्स कंपन्यांनी कळव्यातून दोन दुचाकी उचलून नेल्याचे समोर आले. पण, त्या इन्शुरन्स कंपन्यांनी त्याची पोलीस ठाण्यात माहिती न दिल्याने गुन्हा दाखल करावा लागला. हे प्रकार टाळण्यासाठी अशा कंपन्यांनी वाहन उचलताना त्याची नोंद पोलीस ठाण्यात करावी.- शेखर बगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळवा पोलीस ठाणे