शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ अधिकारी ठरला राजकारणाचा बळी; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:50 IST

सोशल मीडियावर चर्चा, धडक कारवाईमुळे केले लक्ष्य

ठाणे : महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याच्या आरोपावरून वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या एका अधिकाºयाला शासनाच्या सेवेत परत पाठविण्याचा निर्णय मंगळवारी महासभेने घेतला. या विषयावरून संतापलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तर या अधिकाºयाने वागळे इस्टेट प्रभाग समितीत पाय न ठेवण्याचा इशारा दिला आहे. पण त्याचवेळी संबंधित अधिकारी राजकारणाचा बळी तर ठरला नाही ना, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरण्यास सुरुवात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.हा अधिकारी अचानक सर्वच नगरसेवकांसाठी वाईट कसा झाला, असा प्रश्न या संदेशात करण्यात आला आहे. ज्या महिलेला त्याने वारंवार त्रास दिला, त्या महिलेने याबाबत महापालिका अथवा पोलिसांकडे का तक्र ार केली नाही, असे प्रश्नही करण्यात आले आहेत.एखाद्यावर आरोप करण्याआधी किंवा त्याला बदनाम करण्याआधी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिकन्यायाचा वापर न करता एका अधिकाºयाचा बळी देणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या अधिकाºयाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवायांनी कोण दुखावले होते, हातगाड्यांवरील कारवाई थांबविण्यासाठी कोण दबाव आणत होते, शांतीनगर परिसरातल्या कारवाया थांबवण्यासाठी कोणी दबाब आणला, गॅरेजेस तोडताना कारवाई कोणी थांबविली, अशी प्रश्नांची मालिका या संदेशांमध्ये करण्यात आली आहे.चौकशीसाठी नेमली अधिकाऱ्यांची समितीमहासभेत संबंधित अधिकाºयावर झालेल्या आरोपानंतर अखेर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात चार वरिष्ठ अधिकाºयांची समिती नेमली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित आणि सहायक आयुक्त चारुशीला पंडित यांचा त्यात समावेश आहे. ही समिती आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून सोमवार किंवा मंगळवारी आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका