शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खारघर-तळोजा-रोडपालीच्या शेकडो इमारतींची ओसी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:46 IST

सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांत ज्या विकासकांनी विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम केले नाही, अशा सर्व इमारतींची ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र देणे पनवेल महापालिकेने थांबवले आहे.

- नारायण जाधवठाणे : सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांत ज्या विकासकांनी विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम केले नाही, अशा सर्व इमारतींची ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र देणे पनवेल महापालिकेने थांबवले आहे. याचा फटका शेकडो इमारतींना बसणार आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेतला असल्याचे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी लोकमतला सांगितले.खारघर-तळोजा-कळंबोली-रोडपालीत सर्वाधिक फटकाज्या इमारती बांधकाम नियमावलीप्रमाणे असतील, त्यांना ओसी द्यावी, असे निर्देश नगरविकास विभागाने पनवेल महापालिकेला दिले होते. या निर्देशांचे पालन झाले तर पनवेल महापालिका क्षेत्रातील शेकडो इमारतींचे भवितव्य धोक्यात येईल, असे भाकीत लोकमतने १७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये वर्तवले होते. महापालिका आयुक्त देशमुख यांच्या निर्णयामुळे ते आता खरे ठरले आहे. या निर्णयाचा फटका खारघर, करंजाडे, तळोजा, कामोठे, रोडपाली, कळंबोली परिसरात चटईक्षेत्राची चोरी करून घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांकडून कोट्यवधी रुपये लाटू पाहणाºया विकासकांना बसणार आहे. या निर्णयाने त्यांच्या बेबंदशाहीवर वचक बसण्यास मदत होणार आहे.३५ प्रकल्पांच्या ओसी थांबवल्याराज्याच्या नगरविकास खात्यानेच नियमबाह्य इमारतींना ओसी देऊ नये, असे निर्देश दिल्याने हा निर्णय घेतला आहे. यात सध्या पनवेल महापालिकेत आलेल्या परंतु पूर्वी सिडको क्षेत्रात असलेल्या बहुसंख्य इमारतींचा समावेश आहे. आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त विकासकांच्या प्रकल्पांना ओसी मिळणार नाही, असे कळवले असल्याचे देशमुख यांनी यासंदर्भात लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.काय आहे प्रकरण?अनेक बिल्डरांनी विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून इमारती बांधलेल्या असतानाही सिडकोने त्यांना बांधकाम परवानग्या दिल्या. या बांधकाम परवानग्या बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचा अहवाल पुणे येथील नगररचना संचालकांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्याकडे सादर केला होता. त्यामुळे शासनाने याबाबत कठोर भूमिका घेऊन अशा परवानग्या देणाºया अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश ३ आॅगस्ट २०१७ रोजी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी आपल्या दोषी अधिकाºयांना पाठीशी घातले आहे. मात्र, पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी १३ एप्रिल २०१८ रोजी नगरविकास विभागाला पत्र देऊन सरकारच्या ३ आॅगस्ट २०१७ च्या आदेशाबाबत शासनाचा अभिप्राय मागवला होता. त्यानंतर, विद्यमान आयुक्त गणेश देशमुख यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानुसार, १५ नोव्हेंबर २०१८ रोजी नगरविकास विभागाने पनवेल महापालिका आयुक्तांना सिडको क्षेत्रातील पनवेल महापालिकेकडे समाविष्ट झालेली बांधकामे दिलेल्या बांधकाम परवानगीप्रमाणे असतील, तरच त्यांना भोगवटा प्रमाणपत्र द्यावे, असे बजावले. त्यानंतर, देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.चटईक्षेत्राची चोरी ही सिडको क्षेत्रातील उलवे, द्रोणागिरी या भागांतही झालेली असून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यावर आता सिडको काय भूमिका घेते, याकडे नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.>उच्च न्यायालयातही बाजू मांडणारमहापालिका क्षेत्रात शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू असले, तरी त्यांना सीसीही सिडकोने दिली आहे. त्यामुळे त्यांची नक्की संख्या सांगता येणार नाही. मात्र, या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावरील बिल्डरांनी केलेली ही चोरी पनवेल महापालिका निदर्शनास आणणार असल्याचे देशमुख म्हणाले.