शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तर फेरीवालेही टाय सूट घालून धंदा करतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 19:28 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही.

डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही, असा इशारा कष्टकरी हॉकर्स भाजी विक्रेता संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी दिला आहे. डोंबिवली पूव्रेतील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा मेळावा आज पार पडला. यावेली ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना पिटाळून लावणारा असला तरी फेरीवाल हटणार नाहीत. महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी मोक्याचा जागा गिळंकृत करुन त्यावर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. बेकायदा बांधकामे पाडण्याऐवजी फेरीवाल्यावर कारवाई केली जाते. जो बेकायदा बांधकामे करुन त्यासाठी हप्ते घेतात. ते शहर स्मार्ट काय करणार असा संतप्त सवाल सरखोत यांनी उपस्थित केला आहे. फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिका कारवाई करु शकत नाही. महापालिकेने फेरीवाला पथक स्थापन करुन ही कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे. कारवाई करुन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. न्यायालयाने फेरीवाला कारवाईवर बंदी घातलेली असताना कारवाई केली जात आहे. फेरीवाला कायद्याची अंमबजावणीच केली जात नाही. काय कायदा कागदावरच राहिला आहे. महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान सुरु आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचे सव्रेक्षण केले अहे. सव्रेक्षणानुसार 8923 फेरीवाले आहेत. त्याची यादी महापालिकेने अद्याप वेबसाईटवर टाकलेली नाही. यादी टाकणो बंधनकारक होते. महापालिकेने केवळ 5क् टक्केच फेरीवाल्यांचे सव्रेक्षण केलेले आहेत. अद्याप 5क् टक्के फेरीवाल्यांचे सव्रेक्षण बाकी आहे.  जीएसटी कर लागू केल्याने ग्राहक मॉल्स हॉटेल्समध्ये जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त खरेदी फेरीवाल्याकडे केली जाईल. जीएसटीमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याने सरकारच फेरीवाला वाढण्यास जबाबदार असल्याचा आरोप सरखोत यांनी केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार