शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 15:04 IST

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

डोंबिवली - डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्हाला पर्यायी जागा दिली नाही तर आम्ही उपाशी रहायचे का?  त्यामुळे जो पर्यंत पर्यायी जागा देणार नाही तो पर्यंत आम्ही तिथेच बसणार आहोत. पोलीस कारवाई झाली तरी चालेल पण आमच्या सामानाचा पंचनामा झाला पाहिजे अशी मागणी करत फेरीवाल्यांनी केडीएमसीवर शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दोन तास मोर्चा काढला होता. 

कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. रोजगार हक्क मोर्चाला शेकडो फेरीवाले उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी नेतृत्व करत संगितले की, व्यवसाय करणे हा आमचा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे आजपासून आपण स्थानक परिसरात बसणारच. भले कारवाई होऊ दे, अटक होऊ दे, पण समानाचे पंचनामे करण्यात यावेत ही मागणी कांबळे यांनी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला 1 वर्षे होणार असून आद्यपही आम्हाला हक्काची जागा मिळलेली नाही. त्यात दबावतंत्र करण्यात येत आहे, हे योग्य नाही याची नोंद घ्यावी. फेरीवाल्यांना पथ विक्रेता प्रमाणपत्र (वेडिंग सर्टिफिकेट) तातडीने देण्यात यावे, तापूर्ती जागा विनाविलंब  देण्यात यावा. याची अमलबजावणी झाली नाही तर मात्र आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसून तसे झाल्यास त्याची जबाबदारी ही शासनाची राहील असेही सांगण्यात आले. त्यांच्या मागण्याचे निवेदन युनियनने ग प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत याना दिले. त्यावेळी कांबळे, राजेंद्र सोनवणे, मधु बिरमोळे, आशा मगरे, नूतन रणदिवे, भाऊ पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी सांगितले की, आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणार, न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही होणे महत्त्वाचे असून त्याचे उल्लंघन कोणी करू नये, अन्यथा कार्यवाही करावी लागणारच असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीhawkersफेरीवाले