शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:28 IST

सरकारविरोधात संताप : पॅकेजचा विसर पडल्याची टीका

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी आणि त्यानंतर लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनमध्ये रोजी बंद असली तरी रोटीची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात रिक्षाचालक, फेरीवाले यांच्या खात्यात दीड हजार रुपये १५ ते ३० एप्रिलपर्यंत जमा केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, आता पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला तरी अद्याप फेरीवाल्यांच्या खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही.

सरकारची रोटी देण्याची घोषणा केवळ कागदावर असून ती हवेत विरली आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या पॅकेजची रक्कम गेली कुठे असा सवाल फेरीवाले करीत आहेत. सरकारने ही रोटीची रक्कम देण्यासाठी नोंदणीकृत फेरीवाल्यांचा निकष लावला होता. नोंदणी नसलेले फेरीवाले हे माणूस नाहीत का असाही सवाल नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनी केला. मात्र, आता नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांच्या पदरातही काही पडलेले नाही. दिवसाला १०० रुपये याप्रमाणे पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनचा अंदाज घेता दीड हजार रुपये जमा करण्यात येतील असे सांगितले होते. पहिल्या पंधरा दिवसांची रक्कमच खात्यात जमा झालेली नसताना लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीसाठी कोणतीही मदत नाही. पहिलीच मदत प्राप्त झालेली नसताना दुसऱ्या मदतीची अपेक्षा कशी काय करणार असा प्रश्न फेरीवाल्यांनी केला आहे. फेरीवाल्यांसाठी लढा देणाऱ्या डाव्या संघटनांनी महाविकास आघाडीची ही घोषणा निव्वळ अफवा होती अशी टीका केली आहे. संचारबंदीयुक्त लॉकडाऊनमुळे १४ एप्रिल ते १५ मे पर्यंतचा फेरीवाल्यांचा धंदा बुडाला आहे. महिनाभर बसून असल्याने कुटुंबाच्या पोटाला खायला  काय घालायचे असा प्रश्न फेरीवाल्यांना सतावित आहे. रोजी पण नाही आणि रोटी पण नाही अशी स्थिती फेरीवाल्यांवर आली आहे.

फेरीवाले काय म्हणतात

आमचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा पूर्ण रोजगार ठप्प होता. लाट ओसरल्यावर कुठे धंदा सुरू झाला होता. आता पुन्हा बंद आहे. पोटाला काय खायचे असा प्रश्न आहे. सरकारने घोषित केलेली मदत खात्यात जमाच झालेली नाही.         -विलास उतेकर

मी नोंदणीकृत फेरीवाला आहे.  राज्य सरकारने लॉकडाऊन करताना जाहीर केलेली रक्कम कशी आणि कुठून मिळणार, याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे मी मदतीपासून वंचित आहे. माझ्याबरोबर इतरांनाही मदत मिळालेली नाही.         - रामदास बोडके

अनेकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, त्यापैकी एकाच्याही खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत. घोषणा करणाऱ्या सरकारने केवळ घोषणा करून आशा लावण्यापेक्षा खरोखरच ही मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करावी.    - संतोष गुप्ता

सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातील पत्रक अथवा आदेश आमच्या विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. सरकारी आदेश प्राप्त झाल्याशिवाय नक्की काय व कशा प्रकारे करायचे हे अद्याप स्पष्ट नाही.    - प्रशांत गवाणकर, फेरीवाला विभाग अधिकारी, केडीएमसी.

 

टॅग्स :thaneठाणे